26 January 2021

News Flash

“मला तिथे गुदमरल्यासारखं वाटतं”; जेव्हा इम्रान खानने केलं होतं बॉलिवूड पार्ट्यांबद्दल वक्तव्य

इम्रान हा आमिर खानचा भाचा आहे.

अभिनेता आमिर खानचा भाचा व अभिनेता इम्रान खान बॉलिवूडमधल्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होता. इम्रानने जास्त चित्रपट केले नाहीत पण त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. इम्रान आता बॉलिवूडपासून लांब आहे. तरीदेखील तो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. बॉलिवूडमधल्या घराणेशाही आणि पार्ट्यांचा वाद आता सुरू झाला असला तरी इम्रानने याविषयी खूप आधी वक्तव्य केलं होतं.

इम्रानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या चाहत्यांसोबत बोलण्यासाठी ‘ask me anything’ अशी स्टोरी शेअर केली होती. यात इम्रानने घराणेशाही आणि बॉलिवूड यांवर वक्तव्य केले होते. एका नेटकऱ्याने इम्रानला प्रश्न विचारला की, “मी पाहिलेल्या तुझ्या जुन्या मुलाखतींवरून, तू एक असा कलाकार आहे जो पूर्णपणे बॉलिवूडचा झालेला नाही. तू वास्तविक जगात राहतोस असे वाटते. तू स्वत:ला इंडस्ट्रीचा भाग समजतोस का?” त्याला उत्तर देत इम्रान म्हणाला, “खरंतर हा स्वत:हून केलेला प्रयत्न नाही. मला खरंच या गोष्टींमध्ये भाग घेण्याची इच्छा नाही. मला माझे शांततापूर्ण जीवन आवडते. मला माझे जुने मित्र आवडतात. मला मांजर आणि कुत्रे पाळण्याची खूप आवड आहे. बॉलिवूडमध्ये असलो तरी मी मीडियाच्या सर्कसपासून लांब राहण्यास पसंत करतो.”

आणखी वाचा- वरूण धवन ‘या’ महिन्यात अडकणार लग्नबंधनात?

दुसऱ्या नेटकऱ्याने विचारले की, “कधीकधी स्वत: ला इंटरनेटवरवर सर्च करायला कसे वाटते.” यावर इम्रान म्हणाला, “खरंतर मी पूर्णपणे बॉलिवूड बबलमध्ये राहणे, त्यांच्यात वावरणे, त्यांच्यासोबत खाणे-पिणे हे सगळे टाळतो. मला या सगळ्या गोष्टींमुळे गुदमरल्यासारखे वाटते.”

आणखी वाचा- मी जिंकणारंच! अभिनेत्रीनं लावली कारसोबत शर्यत; पाहा हा थक्क करणारा व्हिडीओ

एवढेच नाही तर बॉलिवूड पार्ट्यांबद्दल विचारल्यावर इम्रानने उघडपणाने सांगितले की,” सगळ्या पार्ट्यांमध्ये तेच घडते. लोक मद्यपान करतात, डान्स करतात, एका कोपऱ्यात उभे राहून त्यांना आवडत नसलेल्या व्यक्तीबद्दल गॉसिप करत असतात. मद्यपानानंतर भांडणं होत असतात. म्हणून मी या सगळ्यांपासून लांबच राहतो.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 1:49 pm

Web Title: imran khan spoke about the bollywood drunken parties hookups its bitching and said its suffocating dcp 98
Next Stories
1 मी जिंकणारंच! अभिनेत्रीनं लावली कारसोबत शर्यत; पाहा हा थक्क करणारा व्हिडीओ
2 अभिनेत्याने खरेदी केले नवे घर, सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती
3 वरूण धवन ‘या’ महिन्यात अडकणार लग्नबंधनात?
Just Now!
X