25 September 2020

News Flash

मान्यवरांच्या उपस्थितीत ‘माझा सन्मान’ सोहळा

विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीतर्फे महाराष्ट्रातील काही मान्यवरांना नुकतेच ‘माझा सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

| August 27, 2015 04:55 am

विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीतर्फे महाराष्ट्रातील काही मान्यवरांना नुकतेच ‘माझा सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. मुंबईत झालेल्या या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.‘एबीपी समुहा’चे अध्यक्ष अवीक सरकार, एबीपी न्यूज नेटवर्क प्रा. लिमिटेडचे अशोक वेंकटरमणी यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. या सोहळ्यात संजय मेमाणे, नाना पाटेकर (मनोरंजन क्षेत्र), सुहास बहुलकर, आरती अंकलीकर-टिकेकर (कला), संजय गायकवाड (व्यवसाय), सरोजा भाटे (साहित्य), माधव गाडगीळ, भापकर गुरुजी (सामाजिक), डॉ. संजीव गलांडे (विज्ञान), अजिंक्य रहाणे (क्रीडा) या मान्यवरांना ‘माझा सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.या सोहळ्याचे प्रक्षेपण ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे. तर याच कार्यक्रमाचे पुन:प्रसारण ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत केले जाणार आहे. ‘लोकसत्ता’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 4:55 am

Web Title: in the presence of veterans maza honor ceremony
टॅग Nana Patekar
Next Stories
1 कुणालचा आगामी ‘कौन कितने पानी मे है’ शुक्रवारी प्रदर्शित
2 श्वेता आणि अभिषेकमध्ये कधीही भेदभाव केला नाही – अमिताभ बच्चन
3 कतरिनाबरोबरच्या आगामी चित्रपटात एक अनोखी प्रेम कहाणी – सिद्धार्थ मल्होत्रा
Just Now!
X