‘देश स्वतंत्र झाल्याचा आनंद एक दिवस नाही तर प्रत्येक दिवशी साजरा करायला हवा’, असं वक्तव्य बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनने केलं आहे. रविनाने बॉलिवूडपासून फारकत घेतली असली तरी सामाजिक उपक्रमांमधून सतत चर्चेत राहत असते. समाजात घडणाऱ्या प्रत्येक विषयावर कोणतीही पर्वा न करता रोकठोक आपल मत मांडणाऱ्या कलाकारांच्या यादीत रविनाच नाव कायमच घेण्यात येतं.

‘१५ ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे या दिवशी प्रत्येक नागरिक उत्साहात दिसून येतो. यामुळेच केवळ एक दिवस नाही तर प्रत्येक दिवशी स्वातंत्र्याचा आनंद सेलिब्रेट केला पाहिजं. देशातील नागरिकांचं संरक्षण व्हावं यासाठी देशाच्या सीमेवर प्रत्येक जवान स्वत: च्या प्राणांची बाजी लावत आहे. त्या जवानांचे आपण मनापासून धन्यवाद मानले पाहिजेत. कारण आज ते सिमेवर शत्रूंशी लढतात त्यामुळेच आपण निश्चित राहतोय’, असं रविना म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘ज्यांनी स्वत:च्या प्राणांची आहुती देऊन आपला देश स्वतंत्र केला. त्या साऱ्या शहीद जवानांसाठी आपण रोज हा दिवस सेलिब्रेट केला पाहिजे’. रविना तिच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेचा विषय ठरत असते. सामाजिक प्रश्न असो किंवा बॉलिवूडविषय एखादी गोष्ट रविना कायम तिचं मत स्पष्टपणे मांडत असते. यावेळी ती कधीही परिणामांचा विचार करताना दिसत नाही. त्यामुळेच एक कणखर महिला म्हणूनही तिच्याकडे पाहिलं जातं.