News Flash

Indian Idol 12: सायली कांबळेचे वडील करोना रुग्णांसाठी चालवतात रुग्णवाहिका

जाणून घ्या सविस्तर...

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल.’ सध्या इंडियन आयडलचे १२ वे पर्व सुरु असून आहे. शोच्या आगामी भागात संगीत दिग्दर्शक अनु मलिक आणि मनोज मुंतशिर हे पाहुणे म्हणून येणार आहे. त्यावेळी शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचे आई-वडील देखील तेथे उपस्थित असणार आहेत. दरम्यान स्पर्धक सायली कांबळे भावूक झाली आहे.

सायली कांबळे ही इंडियन आयडलच्या मंचावर गाणे गात असते. परफॉर्म करत असताना ती भावूक होते. त्यावेळी तिला काय झाले? तुझे पालक कुठे आहेत असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ती म्हणाली तिला वडिलांची खूप आठवण येते आणि गेल्या काही दिवसांपासून वडिलांशी काही बोलणे देखील झाले नसल्याचे तिने सांगितले. ते सध्या करोना रुग्णांची मदत करण्यात व्यग्र आहेत असे सायली म्हणाली.

सायलीचे बोलणे ऐकून तेथे उपस्थित असलेले सर्वजण भावूक होतात. त्यानंतर शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायण तिला म्हणाला चिंता करु नकोस, कारण देव तुझे वडील करत असलेले चांगले काम पाहात आहे. ‘इंडियन आयडल १२’मधील आगामी भागामध्ये सायली ‘कभी आर कभी पार’ आणि ‘मिलो ना तुम तो हम घबराएं’ या गाण्यावर परफॉर्म करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 4:17 pm

Web Title: india idol 12 sayli kamble father is covid19 ambulance driver avb 95
Next Stories
1 ‘त्यांनी माझ्याकडे पाहिलं, हसले आणि म्हणाले मी मरणार…’, मुलाने केला खुलासा
2 “दर १० मिनिटांनी येणारा अ‍ॅम्ब्युलन्सचा आवाज आता….” ; हेमांगी कवीची फेसबूक पोस्ट व्हायरल
3 “स्वत:ची बॅगही पकडू शकत नाही”; एकता कपूर ट्रोल
Just Now!
X