करीना आणि सैफ अली खान त्यांचा मुलगा तैमूरवरुन बरेच चर्चेत असतात. या सेलिब्रिटी कीडचे व्हिडियो आणि फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होताना दिसतात. तैमूरच्या नावावरुनही बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांतच सैफचा बाजार हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने घेतलेलल्या एका मुलाखतीत त्याला तैमूरच्या नावावरुन प्रश्न विचारण्यात आला. तैमूरच्या नावावरुन झालेल्या चर्चांबद्दल काय सांगशील असे विचारले असता सैफ म्हणाला, ”भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, हिंदुत्ववादी देश नाही.” सैफ अली खान हा उत्तम संभाषण करणारा म्हणून ओळखला जातो. सैफ चित्रपटांशिवाय इतिहास, ड आंतरराष्ट्रीय विषय, राजकारण यांसारख्या विविध विषयांवर तो आपली परखड मते नोंदवत असतो. त्याने राजकीयदृष्ट्या केलेली ही वक्तव्ये त्याच्या नवाबीपणाला शोभणारीही असतात.

सैफ म्हणाला, स्वातंत्र्यानंतर आणि पाकिस्तानच्या निर्मितीनंतर भारतात उजव्या विचारसरणीची चळवळ उभी राहीली. अशाप्रकारे स्वत:चे अस्तित्व निर्माण करणे हेच हिंदुत्व आहे असे मी समजतो. या विचारधारा भितीदायक वाटत असल्या तरीही त्यामाहे सत्य असते. पण माझी भारताची संकल्पना हे माझे आणि तैमूरचे रक्त इतकीच आहे. आतापर्यंत आपल्याकडे अनेक मोठे नेते, लढवय्ये होऊन गेले. ते चांगले होते की वाईट याबाबत माझ्या डोक्यात काहीच नाही. लोक रामालाही हिंसक म्हणतात असे सैफ यावेळी म्हणाला. त्यामुळे माझ्या डोक्यात अशा गोष्टींविषयी काहीच नाही. तैमूरचा अर्थ लोखंड असा होतो. त्यामुळे मला ते आवडते असेही त्याने यावेळी स्पष्ट केले. कोणत्याही विशिष्ट व्यक्तीवरुन त्याचे नाव ठेवण्यात आलेले नाही. पण हे नाव जर कोणानंतर येत असेल तर तो आपल्या इतिहासाचा भाग आहे.