News Flash

सत्यासाठी आवाज उठविण्याची गरज- अनुष्का शर्मा

लहानपणी तुमचे संगोपन कसे होते त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात

अनुष्का शर्मा

‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०१७’ मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा नुकतीच सहभागी झाली होती. अभिनेत्री आणि करिअरमध्ये फार लवकर निर्माती बनण्याच्या तिच्या यशाला ती सक्षमीकरणाचा प्रवास मानते. ‘इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्ह २०१७’ मधील ‘सेटल फॉर मोअर’ या सत्राची सुरुवात तिने सक्षमीकरणाचा संदेश देऊन केला. तिच्या या संदेशामध्ये, तिचे ज्या पद्धतीने संगोपन करण्यात आले याचाही उल्लेख केला.

अनुष्का म्हणाली की, ‘लहानपणी तुमचे संगोपन कसे होते त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. तुमच्यावर झालेल्या संस्कारांवरच तुमचे व्यक्तिमत्व बनत असते. जसे आपण मोठे होत जातो तसे आपल्यावर केलेल्या संस्कारांचे महत्त्व आपल्याला कळू लागते. त्या संस्करातूनच आपले विचार घडत असतात आणि आपला मित्र-परिवार बनत असतो.’ सक्षमीकरणाबद्दल बोलताना अनुष्का म्हणाली की, सत्याच्या बाजून उभे राहणे हेही तुम्ही सक्षम असल्याची निशाणी आहे. काही चुकीचं घडत असेल तर त्याला नकार दिलाच पाहिजे.

दरम्यान, गेल्या बऱ्याच दिवसांपासून अनुष्का तिच्या आगामी सिनेमाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र असून, विविध कार्यक्रमांना ती मोठ्या उत्साहात हजेरी लावत आहे. ‘फिल्लौरी’ या सिनेमात अनुष्का शर्मा, दिलजीत दोसांज, सुरज शर्मा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात अनुष्का चक्क एका भटकत्या आत्म्याच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्येही उत्सुकता पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 3:51 pm

Web Title: india today conclave 2017 anushka sharma
Next Stories
1 जाणून घ्या, कपिल शर्माची होणारी बायको गिन्नी छत्राथविषयी…..
2 कपिलने फेसबुकवर शेअर केला होणाऱ्या बायकोचा फोटो
3 अनुष्का स्वतःला समजायची कचरा वेचणारी मुलगी
Just Now!
X