छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो पैकी एक म्हणजे ‘इंडियन आयडल.’ सध्या इंडियन आयडलचे १२वे पर्व सुरु आहे. या शोमध्ये सहभागी होणारा प्रत्येक स्पर्धत हा कायचम चर्चेत असतो. पण सवाई भट्ट शो मध्ये सहभागी झाल्यापासून विशेष चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये सवाई भट्ट परफॉर्म करत असताना परिक्षकांनी त्याला मध्येच थांबवले आहे.

इंडियन आयडलच्या कालच्या भागामध्ये छोट्या पडद्यावरील क्वीन एकता कपूर आणि अभिनेता जितेंद्र यांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळले. त्याच वेळी आगामी सीरिज मॅरीड वूमनची संपूर्ण टीम प्रमोशनसाठी इंडियन आयडलमध्ये पोहोचली होती. शोमध्ये परफॉर्म करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाचे एकता, जितेंद्र आणि मॅरीड वूमनच्या संपूर्ण टीमकडून कौतुक होत असल्याचे पाहायला मिळाले. तसेच सर्वजण मजामस्ती देखील करताना दिसत होते.

दरम्यान, स्पर्धक सवाई भट्ट परफॉर्म करत असताना त्याला परिक्षक हिमेश रेशमिया आणि विशाल दादलानी यांनी त्याला थांबवले होते. सवाई भट्ट शोमध्ये ‘हाल क्या है दिलों का’ हे गाणे गात असतो. पण अचानक तो परफॉर्म करत असताना गाण्याच्या ओळी विसरतो. एकदा नाहीत चक्क दोनवेळा सवाई गाण्याच्या ओळी विसरतो. त्यामुळे हिमेश आणि विशाल त्याला थांबवतात. या भागामध्ये चांगला परफॉर्मन्स न दिल्यामुळे सवाई डेंजर झोनमध्ये जातो. पण विशाल आणि हिमेश प्रेक्षकांना सवाईला मत देण्याचे आवाहन करतात.