25 February 2021

News Flash

इंडियन आयडल स्पर्धकाकडून गरीब असल्याचं नाटक? जुने फोटो व्हायरल

नेटकऱ्यांनी जुने फोटो शेअर केले आहेत.

सध्या छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘इंडियन आयडल १२’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शो मध्ये परिक्षक म्हणून नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया हे दिसत आहेत. या तिन्ही परिक्षकांची सेटवर मजामस्ती सुरुच असते आणि त्याचे काही व्हिडीओ कायमच चर्चेत असतात. पण शो आता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. एका स्पर्धकाने शोमध्ये त्याच्या आर्थिक परिस्थितीशी संबंधीत खोटे बोलले असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

‘इंडियन आयडल १२’मध्ये सहभागी झालेला राजस्थानमधील सवाई भट्ट हा स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. पण ऑडिशन दरम्यान त्याने बाहुल्यांचा खेळ दाखवून त्यातून मिळणाऱ्या पैशांनी घर चालवत आहे आणि राहत असलेले घर देखील छोटे आहे असे त्याने म्हटले होते. पण आता सोशल मीडियावर यावर अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

सध्या नेटकऱ्यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये सवाई स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. त्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. एका यूजरने हे फोटो शेअर करत सवाईने इंडियन आयडलमध्ये सांगितलेल्या गोष्टी खोट्या आहेत असे म्हटले आहे. हे फोटोपाहून अनेकांनी शोच्या मेकर्सला देखील प्रश्न विचारले आहेत. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2021 7:27 pm

Web Title: indian idol fame sawai bhatt old photos viral avb 95
Next Stories
1 हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने सासऱ्यांच्या आठवणीत लिहिली भावनिक पोस्ट
2 करण जोहरच्या आगामी चित्रपटात दिसणार विजय देवरकोंडा, फर्स्ट लूक व्हायरल
3 राम मंदिरासाठी योगदान दिल्यानंतरही अक्षय होतोय ट्रोल; जाणून घ्या कारण
Just Now!
X