बॉलिवूड अभिनेत्री किया आडवाणी हिची मुख्य भूमिका असलेला ‘इंदू की जवानी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अबीर सेनगुप्ता दिग्दर्शित सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘इंदू की जवानी’ या चित्रपटातून एक प्रेमकथा उलगडली जाणार आहे. यात कियाराने एका भारतीय स्त्रीची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता आदित्य सील हा पाकिस्तानी नागरिकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)


प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये कियारा, इंदू ही भूमिका साकारत असून आदित्य समर या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. इंदू एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून समरला भेटते आणि त्यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र, याच काळात समर एक पाकिस्तानी नागरिक असल्याचं इंदूच्या लक्षात येतं आणि ती त्याला दहशतवादी समजते. यामध्येच ती त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करते तर समर तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत तो दहशतवादी नसल्याचं पटवून देण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे या सगळ्या प्रवास अनेक मजेशीर किस्से घडताना दिसतात.

वाचा : वडिलांच्या मनाविरुद्ध शेफालीने केलं होतं ‘कांटा लगा’; मिळालं होतं इतकं मानधन

विशेष म्हणजे हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत असून त्या तब्बल ९ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. ‘इंदू की जवानी’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट येत्या ११ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. कियारा अलिकडेच ‘लक्ष्मी’ या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर ती आता ‘इंदू की जवानी’, ‘जुग जुग जियो’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.