18 February 2019

News Flash

VIDEO : KKRच्या परदेशी खेळाडूंना शाहरुखची डायलॉगबाजी ऐकवली तेव्हा…

गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या या संघावर कितीही नाही म्हटलं तरीही बॉलिवूडचा बराच प्रभाव असल्याचं दिसून येत आहे.

छाया सौजन्य- ट्विटर

यंदाचा आयपीएलचा हंगाम फक्त क्रिकेटपटूंसाठीच नाही तर क्रीडारसिकांसाठीसुद्धा परवणीच ठरत आहे. प्रत्येक सामन्यामध्ये अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत होणारा खेळ आणि दमदार खेळाचं प्रदर्शन करणारे खेळाडू या दोन गोष्टींच्या जोरावर आयपीएलने क्रिकेटर रसिकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं आहे. अशा या यंदाच्या आयपीएलच्या ११व्या हंगामात किंग खानचा कोलकाता नाइट रायडर्स हा संघ भलताच चर्चेत आहे. गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या या संघावर कितीही नाही म्हटलं तरीही बॉलिवूडचा बराच प्रभाव असल्याचं दिसून येत आहे.

सोशल मीडियावर ‘रेड चिलीज एंटरटेन्मेंट’च्या अधिकृत पेजवरुन पोस्ट करण्यात आलेला व्हिडिओ पाहून हा अंदाज सहज लावता येत आहे. क्रिकेटच्या मैदानावर प्रभावीपणे फलंदाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या केकेआरच्या खेळाडूंनी त्यांच्या अभिनय कौशल्याची एक झलक दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये केकेआरच्या खेळाडूंवरही किंग खान म्हणजेच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची जादू झाल्याचंच म्हणावं लागेल. कारण हे खेळाडू चक्क शाहरुखच्या चित्रपटातील डायलॉग त्यांच्या अंदाजात सादर करत आहेत. केकेआरच्या परदेशी खेळाडूंनीही किंग खानची डायलॉगबाजी ऐकल्यानंतर आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवली आहे. ज्यामध्ये काही भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे. ख्रिस लिन, सुनील नारायण, पियुष चावला, दिनेश कार्तिक, रॉबिन उत्थप्पा हे सर्व खेळाडू शाहरुखच्या चित्रपटातील त्याचे काही गाजलेले डायलॉग म्हणताना आणि त्याची नक्कल करताना दिसत आहेत.

वाचा : IPL 2018 – शिक्षणासाठी मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूने सोडलं क्रिकेट

शाहरुखच्या ‘रईस’ या चित्रपटातील ‘बॅटरी नही बोलनेका’ हा डायलॉग ख्रिस लिन म्हणत असून, हे वाक्य बोलतानाचा त्याचा अंदाज अनेकांच्याच चेहऱ्यावर हसू आणत आहे. तर सुनील नारायणचीही अशीच काहीशी अव्था झाली आहे. पियुष चावला आणि दिनेश कार्तिक या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत असल्याचं व्हिडिओ पाहून लक्षात येत आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीत या अभिनेत्यांची निवड होऊ शकते असा विचार चाहत्यांच्या मनातही घर करुन जातोय. हा झाला विनोदाचा मुद्दा. पण, शाहरुखचे डायलॉग म्हणत असताना प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर असणारा आनंद, कुतूहल आणि उत्साह यामुळे केकेआरच्या खेळाडूंची ही एसआरके स्टाइल सुपरहिट आले असंच म्हणावं लागेल.

First Published on May 17, 2018 12:12 pm

Web Title: ipl 2018 team kkr dinesh karthik chris lynn sunil narine enact shah rukh khans famous dialogues watch video