06 March 2021

News Flash

या टॅटूमुळे आमिर खानची मुलगी सोशल मीडियावर चर्चेत

इराने तिच्या हातावरील टॅटूचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

इरा खान

भारतीय सिनेसृष्टीत फक्त प्रसिद्ध कलाकारांचीच नाही तर त्यांच्या मुलांचीही चर्चा असते. तैमूर अली खान हे याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. सिनेसृष्टीत पदार्पण केले नसले तरीही बॉलिवूड कलाकारांच्या मुलांचीही लोकप्रियता तुफान आहे. सुहाना खान, आर्यन खान, खुशी कपूर यांचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. सारा खान, अनन्या पांडे या अभिनेत्री चर्चेत असताना काही फोटोंमुळे इरा खानने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानही तिच्या इंस्टाग्राम खात्यावरून अनेक फोटो शेअर करत असते. तिने शेअर केलेल्या काही फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे.

इराने तिच्या हातावरील टॅटूचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचसोबत बेबींवरील पिअर्सिंगचेही फोटोही तिने शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने क्रॉप टॉप घातला असून त्यामध्ये तिच्या बेंबीवरील स्टड दिसत आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोंमुळे सगळ्यांच्या नजर तिच्याकडे वळल्या आहेत. कोणत्याही डिझाईनचे टॅटू न काढता तिने ‘if we won’t, then who will’ असं हातावर लिहून घेतले आहे. हा तिचा पहिलाच टॅटू आहे हे तिने फोटोसोबत लिहिलेल्या कॅप्शन वरून समजतं. यासोबतच तिने ‘मेक द वर्ल्ड बेटर स्पेस’ असंही तिने लिहीलं आहे.

इराने शेअर केलेल्या फोटोंवर अनेकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी बऱ्याच जणांनी तिला ट्रोलही केले आहे. याआधीही अनेकदा इराने ट्रोलिंगचा सामना केला आहे. या ट्रोलिंगकडे ती फारसे लक्ष देत नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2019 12:03 pm

Web Title: ira khan first tatto troll djj 97
Next Stories
1 इशा देओलला कन्यारत्न, जाणून घ्या तिच्या बाळाचं नाव
2 सलमानने फेडले ‘राइझिंग स्टार ३’ विजेत्याच्या वडिलांचे कर्ज
3 रितेश देशमुख का म्हणतोय, ‘स्माइल प्लीज’
Just Now!
X