22 January 2021

News Flash

Video: इरफान पठाणचे अभिनय क्षेत्रात पदार्पण, सुपरस्टार विक्रमसोबत करणार काम

चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. इरफान ‘कोब्रा’ या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात तो दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रमसोबत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी इरफान पठाणचा आगामी चित्रपट ‘कोब्रा’चा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत त्यांनी ‘विक्रम आणि इरफान पठाण मुख्य भूमिकेत असणाऱ्या कोब्रा चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. कोब्रा हा तामिळ चित्रपट असून माजी क्रिकेटपटू इरफान पठाण या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे’ असे म्हटले आहे.

PHOTOS: मराठमोळ्या झहीर खान आणि सागरिका घाटगेचे मुंबईमधील आलिशान घर

सध्या सोशल मीडियावर अभिनेता विक्रम आणि इरफान पठाणच्या ‘कोब्रा’ चित्रपटाचा टीझर चर्चेत आहे. ही जोडी मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन Gnanamuth यांनी केले असून म्यूझिक ए आर. रेहमान यांनी दिले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही. इरफान आणि विक्रमसोबत चित्रपटात केएस रविकुमार, मृणालिनी, कनिका, पद्मप्रिया हे कलाकार दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 12:37 pm

Web Title: irfan pathan cobra teaser released avb 95
Next Stories
1 ‘तुम्ही राष्ट्रवादी असाल तर… ‘; पोलीस चौकशीनंतर कंगनाचं ट्विट
2 शर्मिला टागोर यांचे चित्रपट पाहून अशी होती साराची प्रतिक्रिया
3 एकेकाळी अडगळीच्या खोलीत रहायची फराह खान; असा होता संघर्षप्रवास
Just Now!
X