News Flash

इरफानच्या ‘अंग्रेजी मीडियम’चा ट्रेलर पाहून हृतिक झाला भावूक; म्हणाला…

इरफानच्या पुनरागमनामुळे बॉलिवूड झालं भाऊक

गेल्या काही वर्षांपासून प्रकृतीच्या कारणास्तव सिनेसृष्टीपासून दूर असणारा अभिनेता इरफान खान लवकरच पुनरागमन करत आहे. इरफान ‘अंग्रेजी मीडियम’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी इरफानवर अक्षरश: कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान हृतिक रोशन, शाहिद कपूर, वरुण धवन यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटीही इरफानच्या पुनरागमनाचे कौतुक करत आहेत.

काय म्हणाला हृतिक रोशन?

“इरफान तुझं पुनरागमन खूप हृदयस्पर्शी आहे. आमचं प्रेम आणि प्रार्थना तुझ्यासोबत आहेत. तुझ्या आगामी चित्रपटाची आम्ही सर्वच जण आतुरतेने वाट पाहात आहोत” अशा आशयाचे ट्विट हृतिक इरफानसाठी केले.

काय म्हणाला शाहिद कपूर?

“आम्ही तुझ्या आगामी चित्रपटाची वाट पाहात आहोत” असं ट्विट शाहिद कपूरने केलं आहे.

काय आहे ‘अंग्रेजी मीडियम’च्या ट्रेलरमध्ये

२ मिनिटे ५५ सेकंदाच्या ट्रेलरची सुरुवात ही इरफानची मुलगी राधिका मदनच्या शाळेपासून होते. राधिका अतिशय हुशार असल्यामुळे शाळेमध्ये तिला गौरवण्यात येते. त्यानंतर राधिकाला पुढील शिक्षणसाठी परदेशात जायचे असते. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी इरफान प्रयत्न करत असतो. या कॉमेडी चित्रटात करिना कपूर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याचे ट्रेलरवरुन स्पष्ट झाले आहे.

हा चित्रपट २० मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अदजानियाने केले आहे. नुकताच इरफानने चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या क्षणचित्रांचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यासोबत इरफानने त्याच्या आवाजात एक संदेश रेकॉर्ड केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 3:54 pm

Web Title: irrfan khan angrezi medium hrithik roshan shahid kapoor mppg 94
Next Stories
1 Trailer : जिंकण्याची जिद्द उराशी बाळगणारा ‘केसरी’
2 बॉयफ्रेंडपेक्षा वेटर बरा; ‘व्हॅलेंटाइन डे’ दिवशी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
3 Love Aaj Kal Movie Review: गुंतागुंतीचा ‘लव्ह आज कल’