News Flash

‘नव्या वर्षाचं स्वागत कसं करु?’ ; इरफानच्या पत्नीची भावूक पोस्ट

इरफानच्या आठवणीत सुतापा भावूक

बॉलिवूड अभिनेता इरफान खान याच निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र, आजही त्याच्या आठवणींमध्ये चाहत्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवतात. यात अनेकदा इरफानची पत्नी सुतापा त्याच्या आठवणींमध्ये काही फोटो किंवा पोस्ट शेअर करत असते. यावेळी नव्या वर्षाचं स्वागत करण्यापूर्वी सुतापाने इरफानसाठी अशीच एक भावूक करणारी पोस्ट शेअर केली आहे. यात तुझ्याशिवाय नव्या वर्षाचं स्वागत कसं करु असं तिने म्हटलं आहे.

“२०२० या वर्षाला सर्वात वाईट म्हणणं तसं योग्य ठरणार नाही. कारण, या काळात सुद्धा तू माझ्यासोबत होतास. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी झाडं लावतांना, चिमणीचं घरटं विणताना तू माझ्यासोबत होतास. कसं काय मी २०२० ला निरोप देऊ. इरफान मला नाही माहित मी २०२१ चं स्वागत कसं करेन”,अशी पोस्ट सुतापाने शेअर केली आहे.

दरम्यान, लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल,२०१७ मध्ये प्रदर्शित झालेला इरफानचा चित्रपट द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स २०२१ मध्ये भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. २९ एप्रिल २०२० मध्ये इरफान खानचं निधन झालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 1:19 pm

Web Title: irrfan khan wife sutapa sikdar writes emotional post says how would welcome 2021 ssj 93
Next Stories
1 एका वर्षात कपिल शर्मा भरतो कोटयवधींचा टॅक्स; आकडा वाचून व्हाल थक्क
2 नवीन वर्षात दीपिकाचा महत्त्वाचा निर्णय; सोशल मीडियावरील पोस्ट केल्या डिलीट?
3 मराठी चित्रपटसृष्टीचा दशकभरातला तोटा ४०० कोटींच्या घरात
Just Now!
X