क्रिकेट आणि बॉलिवूडमध्ये जणू अतूट नाते निर्माण झाले आहे. बॉलिवूडमधील सौंदर्यवतींची भुरळ क्रिकेटपटूंवर पडत असल्याचे आपल्याला अनेकदा पाहावयास मिळाले. युवराज सिंग, विराट कोहली, झहिर खान, अझरुद्दीन, हरभजन सिंग, मनसूर अली पतौडी यांसारख्या अनेक क्रिकेटपटूंची विकेट अभिनेत्रींनी काढली. या रांगेत आता भारतीय क्रिकेट संघातील युवा खेळाडू हार्दिक पांड्याचाही नंबर लागण्याची शक्यता आहे. रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मधून प्रसिद्धीच्या माध्यमात आलेली अभिनेत्री एली अवराम आणि हार्दिक एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

PHOTO : स्वप्नील जोशीच्या मुलाचा नामकरण सोहळा

बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये एली सहभागी झाली होती. तेथूनच तिचे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये एली अनेकदा हार्दिकच्याच बाजूला उभी राहिलेली दिसली. द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हार्दिकला पाठिंबा देण्यासाठी ती तेथे गेली होती. त्यामुळे या दोघांच्याही ‘रिलेशनशीप स्टेटस’वरून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

वाचा : माधुरी-सुमितचे रोमॅण्टिक गाणे

भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नींसोबतचा एलीचा फोटो नुकताच व्हायर झाला. शिखर धवनची पत्नी आएशाने मुलगी रिआच्या १३व्या वाढदिवसाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह, भुवनेश्वर कुमारची पत्नी नुपूर नगर, आर अश्विनची पत्नी प्रिती नारायण, उमेश यादवची पत्नी तान्या वाधवा, अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका धोपवकर यांच्यासह एली पोज देताना दिसते.

https://www.instagram.com/p/BeYFk3VjANS/

इतकेच नव्हे तर हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्याच्या लग्नातील एलीच्या उपस्थितीनेही सर्वांचे लक्ष वेधले होते. मनिष पॉलसह एलीने ‘मिकी वायरस’ चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याचसह तिने ‘किस किस को प्यार करू’, ‘नाम शबाना’, ‘हाऊसफुल्ल ३’, ‘पोस्टर बॉईज’ चित्रपटांमध्येही काम केले आहे.