News Flash

‘देवमाणूस’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

जाणून घ्या..

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरून घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी झी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘देवमाणूस.’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. २१ मार्च रोजी या मालिकेचा दोन तासांचा भाग प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

या मालिकेच्या निमित्ताने अतिशय रंजक मर्डर मिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. यात ‘लागीरं झालं जी’ फेम भैय्यासाहेब म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड मुख्य भूमिकेत आहे. किरणची मालिकेतील देवीसिंगची भूमिका विशेष गाजत आहे. पण आता मालिकेचा शेवट होणार का? कसा असणार? देवीसिंग विषयी पोलिसांना सत्य कळणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

अजितकुमार हाच देवीसिंग असल्याचे पोलिसांना कळते का? हे उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील सुरु आजी, डिंपल, टोण्या, बाज्या. विजय, नाम्या, मंजुळा आणि डॉक्टर अमित कुमार अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 6:17 pm

Web Title: is devmanus serial ended on 21 march avb 95
Next Stories
1 बापलेक आमने-सामने! अभिषेकच्या ‘द बिग बुल’ला टक्कर देणार अमिताभ यांचा ‘चेहरे’
2 ‘त्याची आवडती पोझ आणि माझे आवडते एक्स्प्रेशन’, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
3 ‘मुंबई सागा’ प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यात अयशस्वी, कमावले इतके कोटी
Just Now!
X