News Flash

डिजिटल विश्वात पदार्पण करण्यासाठी कपिल शर्मा घेणार इतके कोटी?

कृष्णा अभिषेकने शोमध्ये खुलासा केला होता

कॉमेडियन कपिल शर्मा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. त्याचा कपिल शर्मा शो कायम चर्चेत असतो. आता लवकरच कपिल वेब विश्वात पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच यासाठी तो तगडे मानधन घेणार असल्याचे देखील म्हटले जाते.

काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा शोमध्ये कृष्णा अभिषेकने या संदर्भात खुलासा केला होता. कृष्णाने मजेशीर अंदाजात कपिल शर्मा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे असे म्हटले होते. तसेच त्यासाठी तो २० कोटी रुपये मानधन घेणार असल्याचेही म्हटले होते. खरं तर कृष्णाने हे मजेशीर अंदाजात म्हटले होते पण २० कोटी मानधन ऐकून आता चर्चा सुरु झाल्या आहेत.

सध्या कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ चर्चेत आहे. या चर्चा शोमध्ये महाभारतामधील कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये नीतीश भारद्वाज, गजेंद्र चौहान, पुनीत इस्सर आणि इतर कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान मुकेश खन्ना यांनी शोमध्ये येण्यास नकार देत शोवर टीका केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 1:36 pm

Web Title: is kapil sharma charging 20 crore for digital debut avb 95
Next Stories
1 सई ताम्हणकर ठरली ‘मोस्ट नॅचरल परफॉर्मर ऑफ द इयर’
2 ‘बिग बॉस’च्या घरात पडली दुसरी विकेट; टीम हरताच या अभिनेत्यानं सोडलं घर
3 “आर्यन आणि न्यासा पळून गेले तर?”, शाहरुख आणि कजोलने दिले हे उत्तर
Just Now!
X