कपिलचा बहुप्रतिक्षीत ‘फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा’ शो गेल्या आठवड्यापासून छोट्या पडद्यावर सुरू झाला. आपल्या विनोदानं प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कपिल छोट्या पडद्यावर कधी कमबॅक करतो याची प्रतिक्षा त्याच्या चाहत्यांना होती. अखेर कपिलनं या नव्याकोऱ्या शोसह छोट्यापडद्यावर कमबॅक केलं. कपिलच्या नव्या शोला संमिश्र प्रतिसाद प्रेक्षकांकडून लाभला. कपिलनं कमबॅक केलं याचा चाहत्यांना आनंद होता तर दुसरीकडे कपिलच्या शोमध्ये ती मज्जा नव्हती अशाही प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. कपिलचा जुना सहकलाकार अली असगरनं कपिलला ट्विटरवरून त्याच्या नव्या कोऱ्या शोसाठी शुभेच्छा दिल्या.
कपिलची जादू ओसरली, नवा शो पहिल्याच दिवशी अपयशी
अलीचं ट्विट वाचून कपिलही काहीसा भावूक झाला. कपिलनं किकू शारदा, चंदन प्रभाकर या जून्या सहकलाकारांना घेऊन आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात केली असली तरी जुन्या साथीदारांना तो विसरला नाही हे त्यांनं पुन्हा एकदा दाखवून दिलं. ‘मला शोसाठी शुभेच्छा दिल्यास त्याबद्दल धन्यवाद. पण मला तुमची फार आठवण येते. हा तोच मंच आहे जिथे आपण कोणे एकेकाळी कॉमेडी नाईट विथ कपिलचं चित्रिकरण करायचो. तुमच्याविना हे चित्रिकरण मी कसं पार पाडतोय हे फक्त मलाच ठावूक आहे. माझं तुमच्यावर नेहमीच प्रेम राहिन.’ असं ट्विट कपिलनं केलं. अर्थात त्यात ठराविक सहकलाकारांची नावं घेणं कपिलनं टाळलं. पण आजही कपिलला सुनील ग्रोवर, अली असगर यांची कमी सलते हे मात्र नक्की.
भाजी विकल्यामुळे ट्रोल झाला सुनील ग्रोवर
गेल्यावर्षी कपिल सुनीलमध्ये झालेलं भांडणं इतकं वाढलं की छोट्यापडद्यावरची कपिल सुनीलच्या हिट जोडीत कायमची दरी निर्माण झाली. या दोघांनी एकत्र यावं कपिलनं आपल्या जुन्या सहकलाकारांसोबत नव्यानं शोला सुरूवात करावी अशी इच्छा अनेकांनी बोलून दाखवली. पण काही दिवसांपूर्वी कपिल सुनीलमध्ये झालेल्या ‘ट्विटर वॉर’मुळे त्यांची एकत्र येण्याची शक्यता पुन्हा मावळली आहे. कपिलनं पुन्हा एकदा नव्या प्रवासाला सुरूवात केली असली तरी तो सुनीलला आणि अलीला मात्र विसरला नाही हे या ट्विटच्या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आलं.
Thank u ali bhai .. missing u guys .. it’s the same floor where we used to shoot comedy nights.. I only know how I am shooting without u guys .. love u
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) March 25, 2018