28 November 2020

News Flash

सिद्धार्थ मल्होत्राला कियारा करतेय डेट? अक्षय कुमारच्या इशाऱ्यावरून सुरू झाली चर्चा

पाहा व्हिडीओ

अभिनेत्री कियारा अडवाणी ही अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला गेल्या काही महिन्यांपासून लपूनछपून डेट करतेय. दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिपबद्दल मौन बाळगणंच पसंत केलंय. मात्र कियाराच्या रिलेशनशिपविषयी अक्षय कुमारने एका कार्यक्रमात सूचक वक्तव्य केलं. ‘लक्ष्मी’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अक्षय व कियारा यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी कियारा व सिद्धार्थचा विषय निघाला.

कियाराच्या बॉयफ्रेंडविषयी कपिलने प्रश्न विचारला असता ती म्हणाली, “जेव्हा मी लग्न करेन, तेव्हा मी माझ्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणाने बोलेन.” तिच्या या उत्तरानंतर अक्षय मस्करीत पुढे म्हणाला, “ये बडी सिद्धांतोवाली लडकी है”. अक्षयच्या तोंडून हे वाक्य ऐकताच कियारा लाजली आणि सेटवर एकच हशा पिकला.

कियारा आणि सिद्धार्थ ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. विष्णू वरधन या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर त्याची कथा आधारित आहे. यात सिद्धार्थ हा कॅप्टन विक्रम बत्रा व त्यांचा जुळा भाऊ विशाल बत्रा अशी दुहेरी भूमिका साकारणार असून कियारा ही कॅप्टन विक्रम बत्रा यांची गर्लफ्रेंड डिंपलची भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 5:56 pm

Web Title: is kiara advani dating sidharth malhotra akshay kumar has an answer for it ssv 92
Next Stories
1 Video : लॉकडाउननंतर प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणायचं असेल, तर…
2 काय आहे देवदत्त नागेचे ‘ग्रीन वर्कआऊट’? जाणून घ्या
3 अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर; सहा महिन्यात १ कोटी लोक करु लागले फॉलो
Just Now!
X