News Flash

जून महिन्यात प्रदर्शित होणार ‘द फॅमिली मॅन २’?

या पूर्वी मे महिन्यात ही सीरिज प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात होते.

भारत पाकिस्तान युद्द, जिहाद, दहशतवादी संघटना, धार्मिक दंगली यांसारख्या मुद्द्यांचा समावेश असलेल्या ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनचे बरेच कौतुक झाले होते. या सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मनोज वाजपेयीने अनेकांची मने जिंकली होती. आता लवकरच या सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख सतत पुढे ढकलली जात होती. आता अखेर ही सीरिज जून महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेता मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत असणारी सीरिज ‘द फॅमिली मॅन २’ जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. या सीरिजचे दिग्दर्शक राज आणि डीके लवकरच सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख घोषीत करणार आहेत. या पूर्वी ही सीरिज मे महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात होते. पण याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Video: साखपुडा होताच अभिनेत्याला कोसळले रडू, पत्नीने पुसले डोळे

जानेवारी महिन्य़ात सुरु झालेल्या ‘तांडव’ सीरिजच्या वादानंतर ‘द फॅमिली मॅन-2’ चे प्रक्षेपण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात होते. या वेब सीरिजच्या काही दृश्यांचे चित्रीकरणदेखील बाकी होते. मात्र आता या वेब सीरिजचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीरिजमध्ये मनोज वाजपेयी आणि समंथा अक्कीनेनीसोबत प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या सीरिजद्वारे समंथा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 5:26 pm

Web Title: is manoj bajpayee starrer the family man 2 may release in june avb 95
Next Stories
1 आता हिंदीमध्ये सुद्धा येणार ‘दृश्यम २’ चा रीमेक, पुन्हा झळकणार अजय-तब्बूची जोडी
2 ‘मी सर्जरी केली नाही’, शमा सिकंदरने केला खुलासा
3 अनिकेतच्या परतण्याने मानसीला मिळणार बळ, ‘पहिले न मी तुला’ एका वेगळ्या वळणावर
Just Now!
X