22 September 2020

News Flash

‘रेस ३’बद्दल रेमोचं हे वक्तव्य ऐकून सलमानचा राग अनावर

सलमानने यापुढे कधीच रेमोसोबत काम न करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. यामुळेच 'रेस ४' चित्रपटातून रेमो डिसूझाचा पत्ता कट झाल्याचं कळतंय.

सलमान खान, रेमो डिसूझा

ईदच्या मुहूर्तावर बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खानचा ‘रेस ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. सलमानसोबतच या चित्रपटात अनिल कपूर, जॅकलिन फर्नांडिस, डेझी शाह, बॉबी देओल, साकिब सलीम अशी स्टारकास्ट होती. बॉक्स ऑफीसवर जरी या चित्रपटाने १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला असला तरी कथेच्या बाबतीत मात्र ‘रेस २’ने मार खाल्ला. समीक्षकांकडूनही या चित्रपटाला विशेष दाद मिळाली नाही.

‘रेस ३’ चित्रपटाचं दिग्दर्शन रेमो डिसूझाने केलं होतं. या चित्रपटाच्या अपयशाबद्दल तो प्रथमच व्यक्त झाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला की, ‘चित्रपटाच्या कथेत बऱ्याचदा बदल केले गेले. सलमान खानच्या एण्ट्रीनंतर हे बदल केले गेल आणि याचाच फटका चित्रपटाला बसला.’

View this post on Instagram

#Sikender #race3 #15june #eid

A post shared by Remo Dsouza (@remodsouza) on

वाचा : ‘सीता भी यहाँ बदनाम हुई’; महेश भट्टवरून ट्रोल करणाऱ्यांना रियाचं सडेतोड उत्तर

‘रेस ३’च्या अपयशाचं खापर आपल्या डोक्यावर फोडल्याने साहजिकच सलमानचा राग अनावर झाला. सलमानने यापुढे कधीच रेमोसोबत काम न करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. यामुळेच ‘रेस ४’ चित्रपटातून रेमो डिसूझाचा पत्ता कट झाल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वीच निर्माते रमेश तौरानी यांनी ‘रेस ४’ चित्रपटाची घोषणा केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 5:06 pm

Web Title: is salman khan furious with remo dsouza over his comments on race 3
Next Stories
1 सिडनी विमानतळावर शिल्पा शेट्टीला करावा लागला वर्णद्वेषाचा सामना
2 ७० वर्षांच्या परंपरेला पूर्णविराम; RK स्टुडिओच्या गणपतीला वाजतगाजत निरोप
3 ‘सीता भी यहाँ बदनाम हुई’; महेश भट्टवरून ट्रोल करणाऱ्यांना रियाचं सडेतोड उत्तर
Just Now!
X