01 October 2020

News Flash

नागा-चैतन्य व साई पल्लवीच्या ‘लव्ह-स्टोरी’वर समंथा नाराज?

साई पल्लवी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा-चैतन्य व त्यांनी सून समंथा यांची जोडी चांगलीच चर्चेत असते. समंथा-नागा चैतन्यचा शाही विवाहसोहळा असो किंवा मग त्यानंतर सोशल मीडियावरील त्यांचे विविध फोटो, व्हिडीओ असो.. ही जोडी कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी समंथाने तिचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवशी तिला पतीचा आगामी चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. या चित्रपटात नागा चैतन्य व ‘प्रेमम’ फेम अभिनेत्री साई पल्लवी एकत्र काम करत आहेत. मात्र या दोघांच्या चित्रपटावर समंथाने नाराजी व्यक्त केली आहे.

‘बॉलिवूड लाइफ’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, समंथाला नागा-चैतन्य व साई पल्लवी यांचा ‘लव्ह-स्टोरी’ हा चित्रपट अजिबात आवडला नाही. समंथाने चित्रपटातील ८० टक्के एडिट न केलेला भाग पाहिला. या संपूर्ण भागात साई पल्लवीला नागा चैतन्यपेक्षा जास्त महत्त्व दिल्याचं मत तिने व्यक्त केलं. आपल्या पतीच्या भूमिकेला योग्य न्याय न मिळाल्याची खंत तिन दिग्दर्शकाकडे बोलून दाखवली.

आणखी वाचा : ..अन् ‘तारक मेहता..’च्या सेटवरच जेठालाल व बबितामध्ये झाला वाद 

समंथाचं मत लक्षात घेऊन चित्रपटात योग्य ते बदल केले जातील का हे येत्या काळात समजेलच. समंथा आणि नागा-चैतन्यने ‘मजिली’ आणि ‘मनम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. तर साई पल्लवीचीही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत फार क्रेझ आहे. साई आणि नागा चैतन्यची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहतेसुद्धा उत्सुक असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2020 1:32 pm

Web Title: is samantha akkineni upset with naga chaitanya sai pallavi love story ssv 92
Next Stories
1 …म्हणून प्रिया वारियरने डिअ‍ॅक्टीव्हेट केले इन्स्टाग्राम अकाऊंट
2 ..अन् ‘तारक मेहता..’च्या सेटवरच जेठालाल व बबितामध्ये झाला वाद
3 Video: प्रियांकाने केसांचं केलय तरी काय? चाहत्यांना पडला प्रश्न
Just Now!
X