News Flash

अभिनेत्री नुसरत जहाँच्या प्रेग्नंसीची जोरदार चर्चा! पती निखिल जैन अजूनही अनभिज्ञ?

गेल्या काही दिवसांपासून नुसरत आणि निखिल यांच्या नात्यामध्ये दूरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत

नुसरत आणि निखील यांच्या वैवाहिक आयुष्यात वाद सुरु असल्याचे देखील म्हटले जात आहे

बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या नेहमी चर्चेत असतात. कधी आपलं वक्तव्य तर कधी चित्रपटांच्या निमित्ताने नुसरत जहाँ यांची सोशल मीडियावर चर्चा सुरु असते. पण आता एका वेगळ्या कारणासाठी नुसरत या चर्चेत आहेत. नुसरत जहाँ या प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.

‘हिंदूस्तान टाइम्स बंगाल’ने दिलेल्या वृत्तानुसार, नुसरत या सहा महिन्यांच्या गर्भवती आहेत. तसेच नुसरत यांचा पती निखिल जैनला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले जात आहे. नुसरत आणि निखिल यांच्या वैवाहिक आयुष्यात वाद सुरु असल्याचे देखील म्हटले जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ते दोघे वेगळे राहत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

आणखी वाचा : सारेगमप ‘लिटिल चॅम्प्स’मधील लाडकी बच्चे कंपनी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पण…

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat (@nusratchirps)

नुरसत प्रेग्नंट असल्याच्या चर्चांवर त्यांच्याकडून किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच याबाबत निखिल यांना माहिती आहे की नाही याबाबतचे सत्य देखील समोर आलेले नाही.

नुसरत यांनी २०१९मध्ये उद्योजक निखिल जैनशी लग्न केले. त्या दोघांचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. पण गेल्या काही दिवसांपासून नुसरत आणि निखिल यांच्या नात्यामध्ये दूरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. इतकच नव्हे तर नुसरत या एसओएस कोलकता चित्रपटामधील त्यांचा सहकलाकार यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. पण या सर्व अफवा असल्याचे यशने म्हटले होते. तर दुसरीकडे नुसरत यांना एका मुलाखतीमध्ये याबाबत विचारताच त्या म्हणाल्या होत्या की मला माझ्या खासगी आयुष्याबद्दल सर्वांसमोर बोलायला आवडत नाही. बऱ्याच वेळा लोकं माझ्यावर निशाणा साधतात पण यावर मी काही बोलू इच्छित नाही. एखादी चांगली गोष्ट असो किंवा वाईट, खासगी आयुष्याशी संबंधीत कोणत्याही गोष्टीवर नुसरत यांनी बोलण्याल नकार दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 3:28 pm

Web Title: is tmc mp nusrat jahan pregnant and husband nikhil jain is unaware about it avb 95
Next Stories
1 शाहरुखच्या गाडीभोवती लोक गोळा झाले की सुहाना रडायची!
2 “डॉक्टरांना त्रास देऊ नका, तुम्ही त्यांना मारू शकत नाही”, वरुण धवनने व्यक्त केला संताप
3 ‘द फॅमिली मॅन २’च्या यशानंतर भावूक झाला मनोज वाजपेयी; पोस्ट शेअर करून चाहत्यांचे मानले आभार
Just Now!
X