News Flash

अभिनेत्री इशा केसकरला पितृशोक

पोस्ट शेअर करत दिली माहिती

मराठी अभिनेत्री इशा केसकरच्या वडिलांचं निधन झालं. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत इशाने याबद्दलची माहिती दिली. इशाचे वडील चैतन्य केसकर यांनी २४ नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. वडिलांचा फोटो व त्यासोबत त्यांची जन्मतारीख आणि निधनाची तारीख लिहित इशाने हा पोस्ट शेअर केला.

इशाच्या जवळच्या व्यक्तीने ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, “वडिलांच्या निधनाने इशा पूर्णपणे खचली असून ती सध्या कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नाही. तिच्या वडिलांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती आणि २४ नोव्हेंबर रोजी त्यांचं निधन झालं. वडिलांच्या निधनामुळे इशावर दु:खाचं डोंगर कोसळलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ISHA (@ishackeskar)

इशाने अनेकदा वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. ‘जगातील माझी सर्वांत आवडती व्यक्ती’, असं म्हणत तिने त्यांच्या वाढदिवसानिमित्त फोटो पोस्ट केला होता. इशाच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी तिने एक पोस्ट लिहिली होती. ‘बाबुस्की, तू बेस्ट आहेस. दहावीचा रिझल्ट, मी केलेल्या कॉलेजची निवड, जपानचं स्कॉलरशिप आणि माझ्या करिअरची निवड.. जेव्हा संपूर्ण जग आणि आईसुद्धा माझ्या गोष्टींना नकार देत होती, तेव्हा तू हो म्हणालास. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या होत्या.

‘जय मल्हार’ या मालिकेतून इशाने छोट्या पडद्यावरील तिच्या करिअरला सुरुवात केली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं. विशेष म्हणजे अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी इशाला तिच्या वडिलांनीच प्रोत्साहित केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 8:43 am

Web Title: isha keskar loses her father informs fans on social media ssv 92
Next Stories
1 कंगनाच्या बंगल्यावरील कारवाई बेकायदा
2 करणच्या पोस्टला मधुर भांडारकर यांचे उत्तर, म्हणाले…
3 छोट्या पडद्यावरील अभिनेता शाहीर शेखने केले लग्न, फोटो व्हायरल
Just Now!
X