News Flash

अभिनेत्रीला दुसऱ्यांदा अर्धांगवायूचा झटका, चाहत्यांकडे केली आर्थिक मदतीची मागणी

अभिनेत्रीने कुबूल है, तेनालीराम, इश्कबाज या मालिकांमध्ये काम केले आहे.

कुबूल है, तेनालीराम, इश्कबाज अशा अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निशी सिंग भदली गेल्या दोन वर्षांपासून आजारी आहेत. त्यांना दुसऱ्यांदा अर्धांगवायूचा झटका आला आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०१९मध्ये त्यांना पहिल्यांदा अर्धांगवायूचा झटका आला होता. निशी यांच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे त्यांचे पती संजय सिंग भदली यांनी चाहत्यांकडे मदत मागितली आहे.

नुकताच संजय यांनी बॉम्बे टाइम्सशी संवाद साधला. ‘गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात निशिची प्रकृती अचानक खालावली होती. आम्ही तातडीने तिला रुग्णालयाच दाखल केले. तेथे ७ ते ८ दिवस उपचार करण्यात आले. त्यावेळी ती लोकांना ओळखतही नव्हती. नंतर आम्ही तिला घरी घेऊन आलो. तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली होती. पण यंदाच्या रक्षाबंधंनच्या वेळी तिला पुन्हा अर्धांगवायूचा झटका आला’ असे संजय त्यांनी म्हटले.

त्यानंतर संजय यांनी त्यांना एक मुलगा आणि मुलगी असल्याचे सांगितले. मुलगा सध्या आजी-आजोबांकडे दिल्लीमध्ये राहत आहे, तर मुलगी त्यांच्यासोबतच आहे असे त्यांनी म्हटले. तसेच मुलगी निशीची काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांना अर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संजय यांनी म्हटले. ‘निशीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे. पण तिच्या वैद्यकीय आणि इतर खर्चासाठी आम्हाला अद्याप पैशांची गरज आहे. मी पैशांची गरज असल्यामुळे फ्लॅट देखील गहाण ठेवला आहे. आम्हाला मदतीची गरज आहे’ असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 7:00 pm

Web Title: ishqbaaaz actress nishi singh bhadli paralysed avb 95
Next Stories
1 करण जोहरच्या घरात झाली होती ड्रग्ज पार्टी? एनसीबीकडून चौकशीची शक्यता
2 ‘कमबॅक करायचा असेल तर करण जोहरच्या…’, सुचित्रा कृष्णमूर्तिचा खुलासा
3 ‘माल है क्या?’ असे विचारलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची अ‍ॅडमिन होती दीपिका?
Just Now!
X