News Flash

आलिया माझी चांगली मैत्रीण- वरुण धवन

प्रेक्षकांनाही आमची जोडी आवडतेय हे कळतं

वरुणने होम प्रॉडक्शनद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश न करता मेहनत करून स्वत:च्या पायावर चित्रपटसृष्टीत नाव कमवावे अशी वरुणचे वडील डेव्हिड धवन यांची इच्छा होती. (Image Source: Instagram)

आलिया भट्ट आणि वरूण धवनने त्यांच्या करिअरची सुरुवात एकत्र केली. २०१२ मध्ये आलेल्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमातून या हिट जोडीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासूनच या दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण वरुणचं मात्र या संपूर्ण प्रकरणावर वेगळंच मत आहे.

आलिया भट्ट आणि वरुण धवनने त्यांच्या करिअरची सुरुवात एकत्र केली. २०१२ मध्ये आलेल्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमातून या हिट जोडीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासूनच या दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण वरुणचं मात्र या संपूर्ण प्रकरणावर वेगळंच मत आहे.

‘माझ्यात आणि आलियामध्ये सगळं काही चांगलं आहे. आम्ही दोघांनी आतापर्यंत तीन सिनेमांत एकत्र काम केलं आणि हे तिन्ही सिनेमे सुपरहिट होते. यावरूनच प्रेक्षकांनाही आमची जोडी आवडतेय हे कळतं. तिच्याबरोबर काम करताना खूपच मजा येते. सरते शेवटी ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे हे महत्त्वाचं,’ असं वरुण ठामपणे सांगतो.

गेल्यावर्षी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान, आलिया आणि वरुण सिंगापूरमध्ये डिनर डेटला गेले होते. तेव्हाच या दोघांचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळे हे दोघं एकमेकांना डेट करतायेत की काय, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला होता. याबद्दल ‘हिंदुस्थान टाइम्स’शी बोलताना आलिया म्हणाली की, ‘इतर अफवांप्रमाणाचे ही अफवाही मला चिंताग्रस्त करते.’ याबद्दल वरुणनेही आपले मत मांडले.

वरुण म्हणाला की, ‘अशा प्रकारच्या गोष्टी ऐकून मलाही फार वाईट वाटतं. मी आणि आलिया दोघंही सिंगापूरमध्ये ‘बद्रीनाथ की…’साठी फार मेहनत घेत होतो. माझा आणि आलियाचा हा तिसरा सिनेमा असल्यामुळे आम्ही सतत याच विचारात असायचो की प्रेक्षकांना यावेळी नवीन काय देता येईल.’ पण मग असे काही ऐकायला किंवा वाचायला मिळाले की वाटते जर हेच बोललं जाणार असेल तर मेहनतीला काय अर्थ आहे.

पण एक अभिनेता म्हटलं की या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्याचाच एक भाग बनून जातात. आम्हीही याला अपवाद नाही. सध्या चांगल्यात चांगलं काम करणं याकडे आम्ही लक्ष केंद्रित करतो आहोत.’ सध्या वरुणला लोक त्याच्याबद्दल कोणत्या गोष्टी बोलतात आणि काय लिहितात याच्याशी काहीही फरक पडत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 1:26 pm

Web Title: its always lovely working with alia bhatt varun dhawan
Next Stories
1 बॉलिवूडच्या ‘किंग’चे इंग्रजीचे मार्क्स पाहिले का?
2 सोशल मीडियावर ‘पर्सनल लाइफ’ शेअर करणे मला पसंत नाही – इरफान खान
3 तीन वर्षांतील मोदींच्या कामगिरीचे लतादिदींकडून कौतुक!
Just Now!
X