सलमान खान याचं लग्न हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. सलमानच्या बॉलिवूडमधल्या कारकीर्दीत त्याचं नाव अनेक अभिनेत्रीशीं जोडलं गेलं. अगदी गेल्या वर्षभरात रशियन अभिनेत्री लुलिया वंतूर हिच्या सोबतही सलमान रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चेला उढाण आलं होतं. लुलियाचं भारतात येणं, खान कुटुंबासोबत सहलीला जाणं किंवा सलमानच्या वाढदिवसाला त्याच्यासाठी हिंदीत गाणे गाणं अशा अनेक गोष्टींमुळे या दोघांच्या नात्याबद्दल चर्चांना अधिकच पेव फुटलं.
वाचा : ते माझ्यासाठी चार वर्षे थांबले – अनुष्का शेट्टी
वाचा : ‘मला विरोध करणारी शिवसेना नव्हती’
लुलियाला अनेकदा तिच्या आणि सलमानच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले पण, तिनेच काय अगदी सलमाननेही या प्रश्नावर बाळगलेलं मौन अद्यापही सोडलं नाही. लुलिया रशियन अभिनेत्री असली तरी भारतात मात्र तिची ओळख सलमानची तथाकथित गर्लफ्रेंड अशीच आहे. असं असलं तरी तिने यावर कधीच आक्षेप घेतला नाही. उलट मला सगळेच इथे सलमानची मैत्रीण म्हणून ओळखतात आणि मला यात काहीच गैर वाटत नाही. उलट सलमानची मैत्रीण असणं हे मी माझं भाग्यच समजते असंही लुलिया म्हणाली. भारतात येऊन काम करण्याची माझी कोणातीही योजना नव्हती. पण, मला इथे काम मिळालं, इथे काम करण्याचा खूप चांगला अनुभव मला आला अशी प्रतिक्रियाही लुलियानं दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 18, 2018 12:44 pm