News Flash

Photo : जॅकी श्रॉफची लेक बॉयफ्रेंडसोबत दिसली बोल्ड अंदाजात, फोटो व्हायरल

तिचा प्रियकर बास्केटबॉल प्लेअर आहे

कृष्णा श्रॉफ

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत आहे. कृष्णा अनेक वेळा प्रियकर एबन याच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यातच आता तिने एबनसोबतचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

सध्या कृष्णा प्रियकर एबनबरोबर दुबईमध्ये सुट्टी एन्जॉय करत असून येथील अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत आहे. यामध्ये तिने एका बीचवरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कृष्णा एबनचा हात धरून बीचवर मस्त फिरताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा फोटो चाहत्यांच्या पसंतीत उतरत असून त्यांनी कमेंटमधून कृष्णाला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

Damn.#blessedwiththebest @ebanhyams @doitall23

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff) on

‘आमची भेट सोबो हाऊसमध्ये झाली होती. मी माझ्या एका मित्राला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी माझ्या मित्राने एबनला तेथे बोलावलं. त्यावेळी माझी एबनसोबत पहिली भेट झाली’, असं कृष्णाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

दरम्यान, कृष्णा कलाविश्वापासून दूर असून तिने करिअरची वेगळी वाट निवडली आहे. तिने ट्रान्सजेंडर कम्युनिटीवर एक लघुपट तयार केला होता. या लघुपटाचं चित्रीकरणंही तिनेच केलं होतं. तर एबन हायम्स हा बास्केटबॉल प्लेअर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 11:12 am

Web Title: jackie shroff daughter krishna share pic with boyfriend ssj 93
Next Stories
1 …म्हणून सलमानच्या माजी अंगरक्षकाला पोलिसांनी दोरखंडानं पकडलं
2 आर. माधवनच्या मुलाची कौतुकास्पद कामगिरी, देशाला मिळवून दिलं रौप्य पदक
3 काळवीट शिकार प्रकरण : कोर्टात सुनावणीपूर्वी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी
Just Now!
X