News Flash

तीस वर्षापूर्वीचं चाळीतलं घर पाहून इमोशनल झाला जॅकीदादा

वाळकेश्वर येथे त्याने आयुष्यातील ३० वर्ष घालवली

जॅकी श्रॉफ

अभिनेता जॅकी श्रॉफचं नाव बॉलिवूडचा स्मार्ट हिरो म्हणून घेतले जाते. ८० च्या दशकातला हॅण्डसम हिरो म्हणून जॅकीदादाचंच नाव पुढे यायचं. पण जॅकीच्या नशीबी हे यश सहजा सहजी आलेले नाही. जॅकी सुपरस्टार व्हायच्या आधी आईसोबत मुंबईतील मलबार हिल येथील एका चाळीत राहायचे. यशाची चव चाखल्यानंतरही जॅकीदादा आपले जुने दिवस विसरु शकला नाही. काही दिवसांपूर्वी जॅकी त्याच्या तीन बत्ती येथील जुन्या घराच्या इथून जात होता. मीडिया रिपोर्टनुसार, जॅकीने त्याचं जुनं घर विकत घेण्याची इच्छाही व्यक्त केली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जॅकी अभिनेता अरजन बाजवासोबत गाडीतून फिरताना दिसतो. जॅकी स्वतः गाडी चालवत आहे. व्हिडिओमध्ये जॅकी त्याच्या जुन्या दिवसांबद्दल अरजनला सांगताना दिसतो. हा व्हिडिओ अरजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबतच त्याने अजून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओला कॅप्शन देताना अरजन म्हणाला की, मी जॅकीसोबत कुलाबा येथील एका रेस्तराँमधून जेवण करुन निघत होतो. तेव्हा जॅकीने गाडी त्याच्या जुन्या घराच्या दिशेने वळवली. वाळकेश्वर येथे त्याने आयुष्यातील ३० वर्ष घालवली.

मिड डेला दिलेल्या मुलाखतीत बाजवा म्हणाला की, जॅकी त्यांच्या जुन्या घरापासून जात असताना ते कुठे राहायचे… आईचं स्वयंपाक घर कुठे होतं… या सगळ्या गोष्टी सांगत होते. आईने कशाप्रकारे एकाच घराचे दोन भाग केले होते आणि ते बाल्कनीमध्ये कुठे आंघोळ करायचे याबद्दलही उत्साहाने सांगत होते. जॅकी सरांनी ते घर परत विकत घेण्याची इच्छाही व्यक्त केली. पण घर मालकांना ते घर विकायचे नाही. जॅकीने एका मुलाखतीत सांगितले की, फार वर्षांपूर्वी माझ्या आईने ते घर विकले होते. पण माझं मन आजही तिथेच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 5:39 pm

Web Title: jackie shroff who returned to the chawl who lived before becoming a superstar wants to buy
Next Stories
1 VIDEO : राजकुमार राव, श्रद्धा कपूर ‘दिल से’ गातात तेव्हा
2 …जेव्हा प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री ‘आई हूं यूपी-बिहार लूटने’ गाण्यावर थिरकते
3 बिग बींनी पुन्हा एकदा धरली दक्षिणेची वाट
Just Now!
X