26 March 2019

News Flash

जेव्हा जॅकलिनच्या हातात जिवंत साप येतो

हा व्हिडिओ एका दिवसात १३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला काही ना काही नवीन करुन पाहायला आवडत असतं. ती नेहमीच प्रयोगशील राहिली आहे. आयुष्यात सतत नवीन काही तरी शिकत राहावं असं ती अनेकदा मुलाखतीतही म्हणाली आहे. पोल डान्सनंतर तिचे घोडेसवारी करतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. आता नवीन काय शिकायचे म्हणून सध्या जॅकलिन सापांमध्ये रमताना दिसत आहे. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने एक जिवंत साप पकडला. या व्हिडिओमध्ये जॅकलिन कोणा एका व्यक्तीला सापाच्या तोंडाबद्दल माहिती विचारताना दिसत आहे. जॅकलिनने शेअर केलेल्या हा व्हिडिओ एका दिवसात १३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

जॅकलिनने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले की, ‘श्रीलंकेतील एका वन्यजीव बचाव केंद्रात’. केंद्रातील एका अधिकाऱ्याला जॅकलिनने एक सापाच्या तोंडाशी निगडीत एक प्रश्न विचारला की, ‘याच्या तोंडाच्या वरच्या भागाला काय झाले आहे?’ यावर उत्तर देताना अधिकारी म्हणाला की, ‘साप त्यांच्या जीभेकरवीच साऱ्या गोष्टींचा अनुभव घेत असतात. जेव्हा त्याला काहीही क्रिया करायची असते तेव्हा तो जीभेमार्फतच करतात.’ तिच्या या व्हिडिओला चाहत्यांनी प्रशंसात्मक अनेक कमेंटही दिल्या. एका युझरने लिहिले की, तू प्रत्येकबाबतीत सर्वोत्तम आहेस. तर दुसऱ्या युझरने लिहिले की, तू खरंच एक साहसी महिला आहेस.

जॅकलिनच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती रेमो डिसूजा दिग्दर्शित ‘रेस- ३’ च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या सिनेमात ती सलमान खानसोबत पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहे. सिनेमाचे चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात आहे. यावर्षी १५ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमानंतर सलमानसोबतच ‘किक- २’ च्या चित्रीकरणालाही ती लवकर सुरूवात करणार असे म्हटले जात आहे. पण निर्मात्यांनी मात्र याबद्दल अधिकृत माहिती दिली नाही. जॅकलिनने २००९ मध्ये रितेश देशमुखच्या अलादीन सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

First Published on March 13, 2018 5:42 pm

Web Title: jacqueline fernandez hands a live snake puts in hands watch video