‘बाजीराव मस्तानी’मध्ये काशीबाईंची भूमिका साकारून समीक्षकांची वाहवा मिळवणारी प्रियांका चोप्रा आता प्रकाश झा दिग्दर्शित ‘जय गंगाजल’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रियांकाने नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर तिच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला. ‘जय गंगाजल’मध्ये प्रियांका आभा माथूर या बेडर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रियांकाबरोबर दिग्दर्शक प्रकाश झा हेदेखील दिसत आहेत. या चित्रपटाच्यानिमित्ताने प्रकाश झा अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना प्रियांकाच्या जोडीने प्रकाश झा यांच्या भूमिकेबद्दलही उत्सुकता आहे.