02 April 2020

News Flash

करोना वायरसचा ‘जेम्स बॉण्ड’लाही फटका

करोना वायरसमुळे 'जेम्स बॉण्ड'ही झाला हैराण

करोना वायरसने चीनमध्ये अक्षरश: थैमान घातला आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत १७०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आणि आता तर हा वायरस जवळजवळ २५ देशांमध्ये पसरला आहे. या करोना विषाणूने अगदी जेम्स बॉण्डला देखील सोडलं नाही. जगातील सर्वाधिक लोकप्रिय गुप्तहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉण्डला देखील करोना वायरसचा फटका बसला आहे.

अवश्य पाहा – Video : उर्वशी भलामोठा ड्रेस घालून गेली अन् पंचायत झाली

जेम्स बॉण्डचा ‘नो टाईम टू डाय’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट अभिनेता डॅनियल क्रेगच्या आयुष्यातील शेवटचा बॉण्डपट आहे. परंतु हा चित्रपट चीनमध्ये मात्र प्रदर्शित होणार नाही. करोना वायरसमुळे ‘नो टाईम टू डाय’चा येत्या एप्रिल महिन्यातला प्रिमिअर रद्द करण्यात आला आहे.

अवश्य पाहा – १०वी पास असलेल्यांसाठी ‘इस्रो’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ४५ हजार पगार

अवश्य वाचा – “बुलाती है मगर जाने का नहीं” असं म्हणणाऱ्या एक्स-बॉयफ्रेंडला अभिनेत्रीनं दिलं भन्नाट उत्तर

“चीनमध्ये सध्या करोना वायरसने लोकांना हैराण केले आहे. तेथील लोक आपल्या नातेवाईकांच्या मृत्यूमुळे दु:खी आहेत. अशा वातावरणात चित्रपट प्रदर्शित करणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे चीनमधील चित्रपटाचं प्रदर्शन रद्द करण्यात आलं आहे.” असं मत ‘नो टाईम टू डाय’चे दिग्दर्शक कॅरी जोजी फुकुनागा यांनी व्यक्त केलं

अवश्य वाचा – गोरिलासोबत अभिनेत्रीचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल..

काय आहे कोरोना व्हायरस? कशी घ्याल काळजी

कोरोना व्हायरस सार्स’मध्ये(SARS) जागतिक साथीचा रोग म्हणून आधीच ओळखले गेले आहे, ज्यामुळे आठ हजार लोकांपेक्षा जास्त प्रमाणात जगभरात मोठ्या प्रमाणात बाधीत रुग्ण आढळले. सध्याच्या माहितीनुसार, जलचर जीव अशा प्रकारचे विषाणू संक्रमित करण्याचे ज्ञात नाही, म्हणूनच सीफूडपासून हा वायरस उद्भवण्याची शक्यता नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये, मानवी संक्रमणाची ओळख पटली गेली आहे. सर्वांत प्रभावित होणारा महत्त्वाचा अवयवाचा सहभाग म्हणजे फुफ्फुसांचा आणि त्यानंतर आतडे. पारंपारिकपणे हे संक्रमण अशा लोकांवर परिणाम करतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी आहे, तरीही हे संक्रमण आजार नसलेल्या तरुण व्यक्तींवर देखील परिणाम करीत आहे. तरीही आतापर्यंत यावर, कोणतेही अँटिबायोटिक किंवा लस उपलब्ध नाही, म्हणूनच उपचार पूर्णपणे नैसर्गिक आधारावर केले जात आहेत.

संसर्गजन्य रोगांच्या पहिल्या तत्त्वांमध्ये, सर्वात वाईट बग्स मानवी संपर्काचे चक्र तोडून किंवा निर्जंतुकीच्या स्थितीत संपर्क राखून असतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्याला एखाद्या संसर्गाची सुरूवात झाली आहे, तर तुम्ही डॉक्टरांना किंवा जवळच्या रुग्णालयात जाऊन भेट देणे गरजेचे आहे. निदान होईपर्यंत किंवा लक्षणांचे निराकरण होईपर्यंत स्वत: ला इतरांपासून दूर ठेवा. प्रभावित क्षेत्रांचा प्रवास करणे किंवा त्या भागातील लोकांशी संपर्क साधणे केवळ सरकारी सल्लामसलत किंवा तपासल्यानंतरच करावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 6:28 pm

Web Title: james bond no time to die cancel in china due to corona virus mppg 94
Next Stories
1 ‘लँड करा दे’ फेम तरुण आता स्वयंवरात घेणार भाग
2 Video : उर्वशी भलामोठा ड्रेस घालून गेली अन् पंचाईत झाली
3 सोनू सूदकडून बहिणीला ‘ही’ खास भेट
Just Now!
X