‘जन्नत’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सोनल चौहान वेब विश्वात पदार्पण करत आहे. ‘स्कायफायर’ असं या वेब सीरिजचं नाव असून या सीरिजमध्ये ती डी-ग्लॅम लूकमध्ये दिसणार आहे.
‘स्कायफायर’ या वेब सीरिजमध्ये सोनल मीनाक्षी ही भूमिका साकारत आहे. स्वावलंबी आणि धाडसी महिलेची ही भूमिका असणार आहे. या भूमिकेविषयी ती सांगते, ‘मी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपैकी ही सर्वांत आव्हानात्मक भूमिका आहे. या भूमिकेच्या दोन पैलू आहेत. अत्यंत भावनिक आणि तितकीच कठोर ती या वेब सीरिजमध्ये आहे. मीनाक्षीसुद्धा दिल्लीची असते आणि मी सुद्धा मूळची दिल्लीची असल्याने या भूमिकेला समजून घेण्यास आणखी मदत झाली आहे.’ या सीरिजमध्ये सोनलसोबत प्रतीक बब्बरचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
काही दिवसांपूर्वीच या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सीरिजला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.