मराठी संगीत रंगभूमीवरील मानाचे पान ठरलेले आणि ‘ललितकलादर्श’ने सादर केलेले ‘संगीत जय जय गौरीशंकर’ हे मूळ नटसंचातील तीन अंकी नाटक येत्या ३ जानेवारी २०२१ रोजी ‘यु ट्यूब’वर सादर होणार आहे. या नाटकाचा पहिला अंक सकाळी ९ वाजता  सादर होणार असून दुसरा आणि  तिसरा अंक अनुक्रमे  दुपारी ३ आणि रात्री  ८.३० वाजता सादर होणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार-संपादक विद्याधर गोखले लिखित आणि नटवर्य मामा पेंडसे दिग्दर्शित या नाटकाचे निर्माते गायक-अभिनेते भालचंद्र पेंढारकर हे होते. मूळ नटसंचात पंडित राम मराठे, भालचंद्र पेंढारकर, माया जाधव, जयश्री शेजवाडकर, चंदू डेग्वेकर, सुकुमार, शहाजी काळे हे कलाकार होते. नाटकाचे संगीत वसंत देसाई यांचे होते. तर संगीतसाथ पं.गोविंदराव पटवर्धन, पं.भोजराज साळवी, पं.मधुकर बर्वे यांची होती.

Muralidhar Mohol, Mahayuti meeting,
पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार
infosys profit rs 7969 crore in fourth quarter
इन्फोसिसचा तिमाही नफा ७,९६९ कोटींवर; मार्चअखेर तिमाहीत ३० टक्क्यांची दमदार वाढ
Strange accident happened due to brake failure driver arrested
नागपूर : ब्रेक निकामी झाल्यामुळेच घडला ‘तो’ विचित्र अपघात, चालकास अटक
Brothers Arrested in for more than 12 Crore Online Ticket Scam of Tadoba Andhari Tiger Reserve
ताडोबा ऑनलाईन तिकीट घोटाळाप्रकरणी ठाकूर बंधुंना अटक; १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

 

 

भालचंद्र पेंढरकर यांचे जन्मशताब्दी वर्ष २५ नोव्हेंबर २०२० पासून सुरू झाले आहे. या नाटकाचे लेखक- पत्रकार विद्याधर गोखले यांचा ४ जानेवारी हा जयंती दिन आहे. तसेच ५४ वर्षांपूर्वी म्हणजे रविवार, १४ ऑगस्ट १९६६ या दिवशी सकाळी ९, दुपारी ३ आणि रात्री ८.३० वाजता या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग सादर झाले होते.  नादब्रह्म तर्फे मुकुंद मराठे, ज्ञानेश पेंढारकर आणि ‘जाई काजळ’ चे  राजेश गाडगीळ यांच्या सहकार्याने भालचंद्र पेंढारकर, विद्याधर गोखले आणि पं. राम मराठे यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी हा आगळा प्रयोग केला जात असल्याचे मुकुंद मराठे यांनी सांगितले.