News Flash

महेश मांजरेकरांच्या आगामी टॅक्सी नंबर २४ ला जयंत सांकलाचे संगीत

जगजीत संधू आणि अनंगषा बिस्वास हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत.

महेश मांजरेकर यांच्या आगामी टॅक्सी नंबर २४ चित्रपटासाठी काम करताना संगीत दिग्दर्शक जयंत सांकलाने आनंद व्यक्त केला. “मी महेश सरांना पहिल्यांदा कांटे या चित्रपटात पाहिले आणि तेव्हापासून मी त्यांच्या अभिनयाच्या प्रेमातच पडलो. त्यामुळे, त्यांच्या सिनेमासाठी संगीत देण्याबद्दल मला दिग्दर्शक सौमित्र यांनी विचारल्यावर मी लगेचच होकार दिला”, असं तो म्हणाला.

जगजीत संधू आणि अनंगषा बिस्वास हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सौमित्र सिंग याने केले असून साविराज शेट्टी यांनी निर्मिती केली आहे. जयंत यांनी या सिनेमाला उत्तम संगीत दिले असून त्यांनी यात एक गाणे लिहिलेदेखील आहे.

“मी पार्श्वसंगीताला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. हा सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमा असल्यामुळे यात आवाजाचे चढ-उतारदेखील त्याला साजेसेच ठेवले आहेत. सिनेमाच्या थीम ट्रॅकमुळे आपल्याला ८० च्या दशकातला रॉक अण्ड रोल फील येईल. मी यात जन्नत दिखा दू हा च्रॅक जॅझ प्रकारात तयार केला असून या गाण्यावर रसिक श्रोत्यांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी मी आतूर झालो आहे,” अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केलाय.

जयंत सांकला आणि दिग्दर्शक सौमित्र सिंग यांचा एकत्र असा टॅक्सी नंबर २४ हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी सौमित्र सिंग यांच्यासोबत जयंत सांकला यांनी नसिरुद्दिन शहा आणि नवनी परिहार यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या द वॉलेट या लघुपटासाठी काम केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 5:37 pm

Web Title: jayant sankla gave music to mahesh manjrekar movie taxi number 24
Next Stories
1 जॅकलिनच्या हॉट फोटोवर शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया, म्हणाली…
2 ‘आजारपणात घेतोय माझी काळजी’; बॉयफ्रेंड आदित्यसाठी रसिका सुनीलची खास पोस्ट
3 पोपटलालने केलं लग्न? नववधूच्या स्वागतासाठी गोकुळधामवासी सज्ज
Just Now!
X