लागोपाठ अनेक यशस्वी कलाकृतींच्या माध्यमातून तरुण संगीतकार जयंत सांकला श्रोत्यांचे उत्तम मनोरंजन करत आहे. झी म्युझिकच्या मै तेरे इश्क विच या अल्बमला जयंतने संगीत दिले आहे. नसिरुद्दीन शाह आणि नवनी परिहार यांच्या मुख्य भूमिका असलेल्या द वॉलेट या लघुपटासाठीला त्याने दिलेल्या संगीताला मोठमोठ्या परीक्षकांनी नावाजले आहे. आता जयंत हा कला बाई या नव्या प्रकल्पासाठी सज्ज झाला आहे. या लघुपटात ‘फॅमिली मॅन’ सीरिज फेम शरिब हाश्मी आणि श्रुती बाफना यांच्या मुख्य भूमिका आहेत. वैविध्यपूर्ण दिग्दर्शक सौमित्र सिंग यांनी दिग्दर्शित केलेला हा लघुपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे.

या व्यतिरिक्त, यूएन विमेनसोबत पुरूषी मानसिकतेवर आधारित एका लघुपटावर तसेच, यूपी सरकारसोबत एका संगीत प्रकल्पावरही जयंत काम करीत आहेत. बी-टाऊनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी गायक व गीतकार जयंतने अनेक म्युझिक अल्बम केले. त्यातील तेरे नैना या गाण्याने रसिक श्रोत्यांची मने जिंकून घेतली. जयंतने नुकतेच त्याच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर पेहले कभी आणि शिका या दोन गाणी सादर केल्या आहेत. त्यांच्या या गाण्यांना नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जयंतने त्याच्या शालेय दिवसांपासूनच सांगीतिक प्रवासाला सुरूवात केली. तेव्हापासून त्याने देशविदेशातील 2500 हून अधिक कलाकारांसोबत काम केले आहे. या भारतीय संगीतकाराने एफएसएसएआय, एफआयसीसीआय, ऑलीव्ह, शिण्डलर इलेक्ट्रिकल्स आदी ब्रॅण्ड्ससाठी संगीत दिले असून जयप्रकाश नारायण म्युझियम, रणजित सिंग अव्हेन्यू आदींसारख्या अनेक सरकारी प्रकल्पांवरही काम केले आहे.