29 September 2020

News Flash

जीव झाला येडापिसा : पहिल्याच वटपौर्णिमेला सिद्धीसमोर येणार ‘हे’ आव्हान

प्रत्येक क्षणी सिद्धीसमोर येत असलेल्या या परिस्थितीला ती कशी धैर्याने समोरी जाईल ?

ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. सौभाग्यवती स्त्रियांसाठी या दिवसाचं खास महत्व असतं. त्यातच जर नववधू असेल तर हा दिवस आणखीनच खास होतो. जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी सुवासिनी हे व्रत करतात. त्याप्रमाणेच जीव झाला येडापिसा या मालिकेमध्ये सिद्धीची ही पहिली वटपौर्णिमा असणार आहे. मात्र हे व्रत करणं सिद्धीसाठी मोठं आव्हान ठरणार आहे.

हे व्रत हाच पती सात जन्म मिळावा म्हणून पत्नी करते पण सिद्धीला याच जन्मी तो नवरा नको आहे आणि म्हणूनच ती घरातल्यांना निक्षून सांगते शिवासाठी हे व्रत करणार नाही. पण मग अस काय घडत कि, सिद्धी आत्याबाईनी गावामध्ये आयोजित केलेल्या सामुहिक वट पूजन सोहळ्यामध्ये जाण्यास तयार होते. सिद्धी या सोहळ्यामध्ये जाण्याचे काय कारण असेल ? आत्याबाईचा स्वत:चा राजकीय स्वार्थ पूर्ण करण्यासाठी रचलेला हा डाव असेल का ? या सोहळ्यामध्ये सिद्धी वडाच्या झाडाचे पूजन करत असताना “मला सात जन्म तर काय एक जन्म देखील असा नवरा नको” असं मागण मागते. पण हेच करताना तिला चक्कर येते, शिवा तिला आधार देण्यासाठी जातो. पण तो असं का करतो ? या मागचे कारण काय असेल ? शिवा आणि सिद्धीच्या वैवाहिक नात्यामध्ये विश्वास, प्रेम, आपुलकीच नाही, तर सिद्धी हे वटपौर्णिमेचे पवित्र व्रतवैकल्ये शिवासाठी पूर्ण करण्यास का तयार झाली ? प्रत्येक क्षणी सिद्धीसमोर येत असलेल्या या परिस्थितीला ती कशी धैर्याने सामोरी जाईल, हे बघणे रंजक असणार आहे.

वटपौर्णिमेच्या या पवित्र व्रतानंतर शिवा आणि सिद्धीच्या आयुष्याला कुठली नवी कलाटणी मिळेल. हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. तेव्हा नक्की बघा जीव झाला येडापिसा सोम ते शनि रात्री ८.०० वा. कलर्स मराठीवर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2019 7:02 pm

Web Title: jeev jhala yeda pisa siddhi watpurnima challenge ssj 93
Next Stories
1 Exclusive : जाणून घ्या, मुक्ता बर्वेने का फिरवली नाटकांकडे पाठ?
2 Father’s Day 2019 : वृद्धाश्रमात जाऊन तेजस्विनी पंडितने सेलिब्रेट केला ‘फादर्स डे’
3 शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुई धागा’ची निवड
Just Now!
X