बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी, सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन आणि दीपिका पादुकोणने काही दिवसांपूर्वीच ‘बॉडीशेमिंग’ विरोधात आवाज उठवला होता. त्यांच्या या मोहिमेत आता टीव्ही अभिनेत्रीही सहभागी झाल्या असेच म्हणावे लागेल. त्यामुळे टीव्ही अभिनेत्रीही आता छोट्या पडद्यावर ‘बॉडीशेमिंग’ विरोधात आवाज उठवताना दिसत आहेत. #शेवयुवरओपिनियन हे हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेण्डमध्ये आहे. महिलांना जे हवे ते घालण्याचा त्यांना अधिकार आहे आणि त्यांना अडवण्याचा कोणालाही अधिकार नाही हा संदेश देणारे शेवयुवरओपिनियन हे अभियान आहे. टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट, अंकिता हंसनंदानी, मंदिरा बेदी. रागिणी खन्ना आणि श्रुती सेठने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हातात रेझर पकडून फोटो शेअर केला आहे.

टीव्ही मालिका ‘बेहद’मध्ये नकारात्मक भूमिका साकारणारी जेनिफर विंगेटने तिचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना लिहिले की, ‘लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखाद्या महिलेला ती कशी दिसते यावरुन ती कशी आहे हे ठरवता तेव्हा यावरुन ती काय आहे यापेक्षा तुम्ही काय आहात तेच दाखवून देता. कोणालाही आणि कशालाही तुमच्यातली उर्जा कमी करण्याचे हक्क देऊ नका. जे आपल्यावर टीका करतात त्यांना #शेवयुवरओपिनियन.’

तर दुसरीकडे मोहोब्बते मालिकेतली अभिनेत्री अंकिता हंसनंदानीनेही रेझर हातात घेऊन फोटो शेअर करत म्हटले की, ‘हे त्यांच्यासाठी जे आमच्या कपड्यांवरुन आमचे परिक्षण करतात. #शेवयुवरओपिनियन.’ तर श्रुती सेठ, रागिनी खन्ना, मंदिरा बेदी यांनीही #शेवयुवरओपिनियन हे हॅशटॅग वापरुन वेगवेगळे मेसेज टाकून स्वतःचा फोटो पोस्ट केला आहे.

काही दिवसांपूर्वी स्टार प्लसवरच्या ‘ये हैं मोहब्बतें’ मालिकेतली अभिनेत्री अंकिता हंसनंदानीने आपल्या नवऱ्यासोबत बॅग्ज डॉट कॉमवर विविध डिझायनर बॅगांचे उद्घाटन केले. दरम्यान अंकिताने खास जवळच्या मित्रांसाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला दिव्यांका त्रिपाठीपासून ते ‘दिल से दिल तक’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलेल्या रश्मी देसाईनेही हजेरी लावली होती.