News Flash

‘सैराट कपल’ फिल्मफेअरच्या कव्हरपेजवर

'धडक'मुळे प्रकाशझोतात आलेल्या या जोडीने नुकतंच फिल्मफेअरच्या ऑगस्ट महिन्याच्या आवृत्तीसाठी फोटोशूट केलं.

इशान-जान्हवी

जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांनी नुकतंच ‘धडक’ या चित्रटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने इशान आणि जान्हवी बराच वेळ एकमेकांबरोबर घालवत असून त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीत उतरताना दिसत आहे. यामुळेच प्रसिद्ध मासिक फिल्मफेअरने त्यांच्या आगामी आवृत्तीच्या कव्हरफोटोसाठी इशान-जान्हवीची निवड केली आहे.

‘धडक’मुळे प्रकाशझोतात आलेल्या या जोडीने नुकतंच फिल्मफेअरच्या ऑगस्ट महिन्याच्या आवृत्तीसाठी फोटोशूट केलं असून या फोटोमध्ये ते दोघंही कुल अंदाजात दिसून येत आहे. विशेष म्हणजे या फोटोमधील त्यांचा अंदाज चाहत्यांच्या पसंतीत उतरत असून त्यांनी या जोडीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.


दरम्यान, ‘धडक’पासून करिअरची सुरुवात केलेल्या जान्हवीच्या करिअरचा आलेख आत्ताच उंचावत असून काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी जान्हवीच्या आगामी चित्रपटामध्ये गाण गाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2018 7:23 pm

Web Title: jhanvi ishaan filmfare photoshoot
Next Stories
1 ‘नकळत सारे घडले’मध्ये स्वानंद किरकिरेंची हजेरी
2 चित्रपटाच्या सेटवर ‘कलंक’
3 #HappyPhirrBhagJayegi : सोनाक्षीचा हॅपी अंदाज प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास सज्ज
Just Now!
X