नवीन वर्षात ज्या कलाकारांच्या चेहऱ्यांवर हसू असेल त्यात जॉन अब्राहमचे नाव नक्कीच अग्रस्थानी असेल यात काही शंका नाही. त्याला कारणही तसेच आहे म्हणा.. त्याने पुन्हा एक स्वतःसाठी खास कार मागवली आहे. ही गाडी त्याने दोन महिने आधीच बूक केली होती. आता त्याच्या इतर गाड्यांच्या ताफ्यात ही गाडीही उभी आहे. दोन महिन्यांपूर्वी या गाडीची ऑर्डर त्याने दिली होती. पण जेव्हा पासून ऑर्डर दिली तेव्हापासून त्याला कधी एकदाची ती गाडी घरी येते असेच झाले होते. त्यामुळे दिवस रात्र त्याच्या डोक्यात या गाडीचेच विचार असायचे म्हणून त्याला झोपही लागत नव्हती. त्याला गाड्यांबद्दल असणारे प्रेम सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे एखादी नवीन गाडी घेतल्यावर त्याच्या मनात होणारी घालमेल सगळ्यांनाच कळू शकेल.

सिनेमांनंतर त्याला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीवर प्रेम असेल तर ते म्हणजे गाड्या आणि बाइक्स हेच आहेत. गॉडझिला असे या गाडीचे नाव असून या गाडीची किंमत साधारणतः २ कोटी रुपये आहे. निसानच्या या कारचे (आर३५ जीटी-आर) वैशिष्ट्य म्हणजे या गाडीचे इंजिन जपानमध्ये बनले आहे. या दोन सीटर गाडीमध्ये सिक्स स्पीड ड्युअल ऑटोमॅटीक क्लच आहेत. कार आणि त्याचा वेग यांचे वेड असणाऱ्यांना या गाडीचे महत्त्व नक्कीच कळेल. तसेच ट्विन टर्बो व्ही- ६ इंजिन असलेली ही कार ३८०० सीसीची आहे. असे म्हटले जाते की, ही कार २.९ सेकंदात १०० किमी प्रती तासाच्या वेगात पकड घेऊ शकते.

john666

जॉनकडे महागड्या गाड्यांची मोठी लिस्टच आहे. कोणतीही नवीन गाडी बाजारात आली आणि ती त्याच्या गाड्यांच्या ताफ्यात नसेल असे होणे नाहीच. ऑडी- क्यू ७ ही त्याची सर्वात आवडती गाडी आहे. या गाडीचे मॉडेल तो प्रत्येक वर्षी बदलत असतो. याशिवाय त्याच्याकडे पांढरी जीप, काळी लॅम्बॉर्गिनीही आहे. त्यामुळे जॉन नवीन वर्षाला स्वतःलाच याहून चांगली भेटवस्तू देऊ शकत नाही. जॉनला फक्त गाड्यांचेच नाही तर बाइक्सचेही तेवढेच वेड आहे. तो प्रत्येक आठवड्याला आपली बाइक बदलत असतो आणि त्याबदल्यात दुसरी नवी कोरी बाइक घेत असतो. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये त्याने स्पष्ट केले होते की, त्याचे गाड्यांसाठीचे प्रेम कधीच संपणार नाही.

जॉनच्या सिनेमांबद्दल सांगायचे तर, १८ नोव्हेंबरला त्याचा ‘फोर्स २’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात जॉनसोबत सोनाक्षी सिन्हाही होती. जेनेलिया डिसुझानेही या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत होती. ‘फोर्स’ या सिनेमाचा हा सिक्वल होता.