30 March 2020

News Flash

‘मिशन मंगल’च्या यशानंतर जॉनने दिल्या शुभेच्छा, अक्षयच्या रिप्लायने जिंकली चाहत्यांची मनं

या दोघांमध्ये व्यावसायिक वैर आहे असं म्हटलं जातं.

जॉन अब्राहम, अक्षय कुमार

एकाच दिवशी दोन किंवा त्याहून अधिक चित्रपट प्रदर्शित झाल्यास त्याचा फटका कोणत्या तरी चित्रपटाला किंवा कधी कधी दोन्ही चित्रपटांना बसतो. अशा वेळी स्पर्धा कायम ठेवत बॉलिवूडमधील नाती जपणं फार महत्त्वाचं ठरतं. याचं उत्तम उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं. २५ ऑगस्ट रोजी जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेला ‘बाटला हाऊस’ व अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ प्रदर्शित झाला. एकीकडे अक्षयचा चित्रपट १०० कोटींची कमाई करतोय तर दुसरीकडे जॉनच्या चित्रपटाने ५० कोटींचा आकडा गाठला आहे. ‘मिशन मंगल’च्या यशानंतर जॉनने अक्षयला शुभेच्छा दिल्या आणि त्यावर अक्षयने दिलेला रिप्लाय सध्या नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे.

‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत जॉनने सांगितलं की, ”बाटला हाऊससाठी मला अनेकांचे मेसेज आले. पण मी जेव्हा मिशन मंगलच्या यशावर शुभेच्छा देण्यासाठी अक्षयला मेसेज केला तेव्हा त्याने मला सर्वोत्तम रिप्लाय दिला. मी तुझ्यासाठीही फार खूश आहे. आता आपण एकत्र काम करण्याची वेळ झाली आहे असं अक्षय म्हणाला.”

आणखी वाचा : सोनम कपूरला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिल्यावर ती म्हणते..

जॉन व अक्षयने ‘देसी बॉइज’ या चित्रपटात एकत्र काम केलं. या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. याविषयी जॉन पुढे म्हणाला, ”स्पर्धा सकारात्मक असेल तर चांगलं वाटतं. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून प्रेम मिळतंय. त्यामुळे मी फार खूश आहे.”

गेल्या वर्षीही जॉनचा ‘सत्यमेव जयते’ व अक्षयचा ‘गोल्ड’ चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाला होता. या दोघांमध्ये व्यावसायिक वैर आहे असं म्हटलं जातं. पण दोघांनी या चर्चा अनेकदा फेटाळल्या आहे.

२००८ साली दिल्लीतील बाटला हाऊस चकमक प्रकरणावर ‘बाटला हाऊस’ हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १४.५९ कोटी रुपयांची कमाई केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2019 4:59 pm

Web Title: john abraham texts akshay kumar on mission mangal success khiladi kumar reply wins the day ssv 92
Next Stories
1 सोनम कपूरला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिल्यावर ती म्हणते..
2 हिना खानने विदेशात फडकावला भारताचा झेंडा
3 करणच्या घरी सेलिब्रिटींची ड्रग्ज पार्टी? जाणून घ्या सत्य
Just Now!
X