25 February 2021

News Flash

‘सत्यमेव जयते 2’ चं चित्रीकरण सुरु; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

'सत्यमेव जयते 2' चं पोस्टर विशेष गाजलं होतं

अॅक्शन- थ्रिलर चित्रपट म्हटलं की बॉलिवूडमधील ठराविक कलाकार डोळ्यांसमोर येतात. यामध्ये अभिनेता जॉन अब्राहमचे नाव प्रामुख्याने समोर येते. बॉलिवूड मधला फिटनेस फ्रिक अभिनेता म्हणून जॉन अब्राहमकडे पाहिलं जातं. अनेक गाजलेले चित्रपट केल्यानंतर जॉन ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटामध्ये झळकणार असून लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

काही दिवसांपूर्वी ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. या पोस्टरमध्ये जॉन हल्कसारख्या लूकमध्ये दिसून आला होता. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यानंतर आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

सध्या लखनऊमध्ये या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून २१ मे २०२१ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी जून महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. मात्र, लॉकडाउनमुळे हे चित्रीकरण अर्ध्यावर रखडलं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलाप झवेरी करत असून जॉनसोबतच अभिनेता मनोज बाजपेयीदेखील स्क्रीन शेअर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 6:43 pm

Web Title: john abraham to start shooting for satyamev jayate 2 from wednesday dcp 98 ssj 93
Next Stories
1 प्रथमेश अन् पार्थची धम्माल जोडी; ‘डॉक्टर डॉक्टर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
2 ‘सूरज पर मंगल भारी’ : सुप्रिया पिळगावकर दिसणार मनोज बाजपेयी आणि दिलजीत दोसांजसोबत
3 “हृतिकने अंघोळ करुच नये”; कियाराने व्यक्त केली अनोखी इच्छा
Just Now!
X