News Flash

जॉन सीनाही म्हणतोय, ‘अपना टाइम आएगा’

'गली बॉय' रणवीरची भुरळ हॉलिवूड अभिनेता आणि रेसलर जॉन सीनालाही

रणवीर सिंग, जॉन सीना

स्वप्नपूर्तीसाठी धडपडणारा रॅपर डिव्हाइन याची प्रेरणादायी आणि रंजक कथा घेऊन ‘गली बॉय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अभिनेता रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना ‘रॅप’ या संगीत प्रकाराच्या आणखी जवळ नेलं. चित्रपटातील ‘अपना टाइम आएगा’ हे रॅप खूप गाजलं. रणवीरची भुरळ आता प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता आणि रेसलर जॉन सीनालाही पडली आहे.

जॉन सीनाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रणवीरचा ‘गली बॉय’ या चित्रपटातील फोटो शेअर केला आहे. या फोटोवर ‘अपना टाइम आएगा’ लिहिलं आहे. या फोटोला भरभरून लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. त्याचसोबत जॉन सिनाने हा फोटो शेअर करण्यामागचं नेमकं कारण काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण त्याने फोटोच्या कॅप्शनमध्येही काहीच लिहिलेलं नाही.

जॉन त्याला आवडणारे पोस्ट आणि फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असतो. म्हणूनच त्याने इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये (bio) ‘माझ्या इन्स्टाग्रामवर तुमचं स्वागत आहे. कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय इथे फोटो पोस्ट केले जातील,’ असं लिहिलं आहे. याआधी जॉनने शाहरुख खानचाही फोटो शेअर केला होता.

वाचा : सलमानचे ट्विट्स मला दाखवू नका; चिडलेल्या सोना मोहपात्राची ट्विटरला विनंती

झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ या चित्रपटात झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा आहे. मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या ‘डिव्हाइन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून ‘गली बॉय’च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 2:12 pm

Web Title: john cena posts picture of ranveer singh gully boy apna time aayega netizens wants to know more
Next Stories
1 #kalank : करणच्या वडिलांचं स्वप्न जेव्हा सत्यात उतरतं…
2 सलमानचे ट्विट्स मला दाखवू नका; चिडलेल्या सोना मोहपात्राची ट्विटरला विनंती
3 ‘करण-अर्जुन’ला एकत्र आणण्यास भन्साळींना येणार का यश?
Just Now!
X