24 November 2020

News Flash

WWE सुपरस्टार जॉन सिनाच्या दिवाळी शुभेच्छा, शेअर केला रणवीरचा फोटो

काही तासात तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक प्रतिक्रिया

देशभरात सध्या दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान WWE सुपरस्टार जॉन सिना याने देखील सर्व भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Cena (@johncena) on

आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष? जगभरातील सेलिब्रिटी चर्चेत राहण्यासाठी विविध सणांना अशा शुभेच्या देतच असतात. परंतु यातील गंमतीशीर बाब म्हणजे जॉन केवळ शुभेच्छा देऊन थांबला नाही, तर त्याने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याचा एक फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अर्थात हा फोटो शेअर करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण या पोस्टवर त्याने कुठल्याही प्रकारची कॉमेंट केलेली नाही. सध्या जॉनने केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासात तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Cena (@johncena) on

 

View this post on Instagram

 

A post shared by John Cena (@johncena) on

रणवीर सिंग हा जॉन सिनाच्या सर्वात आवडत्या कलाकारांपैकी एक आहे असे म्हटले जाते. याआधीही जॉनने त्याच्या गल्ली बॉय या चित्रपटातील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 2:47 pm

Web Title: john cena shares picture of ranveer singh mppg 94
Next Stories
1 … म्हणून मुलाच्या असह्य आजारात अशोक सराफ राहिले दूर
2 ‘ब्रेकअप’नंतर रविनाने केला होता आत्महत्येचा प्रयत्न…
3 ‘यंदाची दिवाळी फटक्यांनी नाही, तर दिव्यांच्या प्रकाशात साजरी करा’, बॉलिवूड कलाकारांनी दिल्या शुभेच्छा
Just Now!
X