News Flash

“पत्नीचा मार खाऊन ४८ कोटी रुपये गमावल्यासारखं वाटलं”; अभिनेत्याचा कोर्टात अजब दावा

जॉनी डेपने अ‍ॅम्बर हर्डवर केला अजब आरोप

हॉलीवूड सुपरस्टार जॉनी डेप व अ‍ॅक्वामॅन फेम अ‍ॅम्बर हर्ड या दोघांमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे. अ‍ॅम्बर हर्ड ही जॉनी डेपची घटस्फोटित पत्नी आहे. तिने जॉनीवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरु आहे. दरम्यान जॉनीने कोर्टात अ‍ॅम्बरबाबत चकित करणारा अनुभव सांगितला. ती जेव्हा त्याला मारायची तेव्हा त्याला ६ कोटी ५० लाख अमेरिकी डॉलर्स (जवळपास ४८ कोटी ९६ लाख रुपये) गमवल्यासारखं वाटायचं.

अवश्य पाहा – विमानात सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

अ‍ॅम्बर हर्डने कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपाखाली जॉनीवर तब्बल ५० लाख अमेरिकी डॉलर दावा ठोकला होता. हे प्रकरण गेल्या दोन वर्षांपासून कोर्टात सुरु आहे. मात्र अ‍ॅम्बरला पुराव्यांअभावी आपले आरोप अद्याप सिद्ध करता आलेले नाहीत. उलट काही महिन्यांपूर्वी दोघांच्या संभाषणाची एक खासगी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये जॉनी ऐवजी अॅम्बरच त्याच्यावर हल्ला करत असल्याचे ऐकू येत होते. द सनने दिलेल्या वृत्तानुसार ही क्लिप जॉनीच्या वकिलांनी कोर्टात सादर केली. त्यावेळी कोर्टात खटला सुरु असताना जॉनी म्हणाला, “जेव्हा जेव्हा मी माझ्या घटस्फोटित पत्नीचा मार खाल्लाय तेव्हा मला ६ कोटी ५० लाख अमेरिकी डॉलर्स गमवल्यासारखं वाटलं आहे.” एवढेच पैसे गमावल्यासारखं त्याला का वाटतं? याबाबत त्याने काहीही सांगितलं नाही.

अवश्य पाहा – पंतप्रधान सहाय्यता निधीमधील पैशांच काय झालं?; बॉलिवूड संगीतकाराचा केंद्र सरकारला सवाल

नेमकं प्रकरण काय आहे?

२०१६ साली अ‍ॅम्बर हर्ड व जॉनी डेप विवाहबद्ध झाले होते. अ‍ॅम्बर हर्ड ही जॉनीची तीसरी पत्नी होती. परंतु पुढे अंतर्गत मतभेदांमुळे वर्षभरातच त्यांचा संसार मोडीस निघाला. गेली चार वर्ष दोघे एकमेकांविरोधात आरोप करत आहेत. सर्वप्रथम अ‍ॅम्बरने जॉनीवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करत ५० लाख अमेरिकी डॉलरचा दावा ठोकला होता. परंतु पुराव्यांअभावी तिचे दावे खोटे ठरले. त्यानंतर जॉनीने तिच्या मानहानिचा दावा ठोकला. हे प्रकरण गेली चार वर्ष कोर्टात सुरु आहे. व्हायरल झालेल्या या नव्या ऑडियो क्लिपमुळे या वादाला आता आणखी एक नवे वळण मिळाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 1:30 pm

Web Title: johnny depp told bodyguard that amber heard cut my finger off mppg 94
Next Stories
1 बिहारनंतर मुंबईमधील रस्त्याला सुशांतचे नाव देण्याची मागणी
2 …म्हणून माधुरीने शेअर केलेल्या फोटोची होत आहे चर्चा
3 नियमावलीचं पालन करत ‘या’ मराठी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण
Just Now!
X