करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. जगभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. या प्रतिकूल परिस्थितीचा जबरदस्त आर्थिक फटका सिनेसृष्टीलाही बसला आहे. अनेक मोठमोठ्या चित्रपटांचे चित्रीकरण लांबणीवर गेले आहे. दरम्यान २०२० मधील सर्वात जास्त चर्चेत असलेला ज्युरासिक वर्ल्ड: डॉमिनिअन हा चित्रपट देखील तब्बल २ वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

अवश्य पाहा – शौक बडी चीज है! केवळ सेलिब्रिटींना परवडणारी जॅकेट्स

या चित्रपटाचं चित्रीकरण मे महिन्यात सुरु होणार होतं. परंतु करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आता थेट पुढल्या वर्षीच शूटिंगचा नारळ फोडला जाईल अशी माहिती दिग्दर्शक कोलीन ट्रेवेरो यांनी दिली. “गेल्या तीन महिन्यांपासून मी जगातील सर्वोत्कृष्ट कलाकारांसोबत काम करत आहे. संपूर्ण जगात धुमाकूळ घालेल अशा एका असाधारण चित्रपटावर आम्ही काम करत आहोत. परंतु करोनामुळे प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते.” अशा आशयाचं ट्विट करुन त्यांनी ज्युरासिक वर्ल्ड: डॉमिनिअन हा चित्रपट लांबणीवर गेल्याचं सांगितलं. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “सरकारी पुरस्कार परत करणार होतीस ना?”; रियाची सुटका होताच स्वराने कंगनाला डिवचलं

मरण पावणारा प्रत्येक दहावा रुग्ण भारतातील

देशातील करोना संकट अजूनही नियंत्रणात आल्याची परिस्थिती नाही. देशातील रुग्णसंख्या ६४ लाखांच्या घरात पोहोचली आहे. तर मृतांचा आकडाही एक लाखांच्या जवळ पोहोचला आहे. करोनामुळे मरण पावणाऱ्या मृतांचा जगभरातील आकडेवारीवर नजर टाकल्यास करोनामुळे मृत्यू होणारा प्रत्येक दहावा रुग्ण भारतातील आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ८१ हजार ४८४ नव्या करोना बाधितांची नोंद करण्यात झाली आहे. तर १ हजार ९५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णासंख्येची भर पडल्यानं देशातील करोना बाधितांची एकूण संख्या ६३ लाख ९४ हजार ४८४ वर पोहोचली आहे. यात सध्या ९ लाख ४२ हजार २१७ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५३ लाख ५२ हजार ०७८ जणांनी करोनावर मात केली आहे.