News Flash

बहुचर्चित ‘काबिल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

'ये खेल उन्होनो शुरु किया था, तमाशा आप लोगोने देखा है...खत्म मै करुंगा'

'काबिल' चित्रपटांमध्ये हृतिक एका अंध व्यक्तिची भूमिका साकारणार आहे.

हृतिक रोशन आणि यामी गौतम यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘काबिल’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हृतिक आणि यामी सध्या त्यांच्या आहामी चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चांगलेच चर्चेत आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून ‘काबिल’ या चित्रपटातून हृतिक हटके भूमिका साकारत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या सर्व चर्चांतून प्रेक्षकांना उद्भवलेल्या प्रश्नांचे उत्तर हृतिकच्या ‘काबिल’ चित्रपटाच्या ट्रेलरमधून मिळत आहे.

‘काबिल’ या चित्रपटामध्ये हृतिक आणि यामी दोघेही अंध व्यक्तिरेखा साकारत आहेत. नेहमीच विविध अंदाजांमध्ये दिसणारा हृतिक या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला ‘रोहन भटनागर’च्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येतो. या ट्रेलरमधील यामीचा लूकही अगदी निरागस आहे. दोन्ही कलाकारांच्या भूमिका आणि त्यांचे अंधत्त्वावर मात करणारे संवाद या ट्रेलरची वैशिष्ट्ये आहेत.

अतिशय सकारात्मक वळणावर सुरु झालेला हा ट्रेलर जसजसा पुढे जातो तसतसे कथानक बदलत जाते. ‘सु’ म्हणजेच यामी गौतम एका वाईट प्रसंगाला बळी पडते. अशी वेळी मग कायदाच या चित्रपचातील ‘रोहन’ आणि ‘सु’ च्या मदतीस येत नाही, मग स्वत: ‘रोहन’ म्हणजेच हृतिक न्याय मिळवण्यासाठी पुढे सरसावतो आणि या चित्रपटाच्या कथानकाला एक वेगळीच कलाटणी मिळते. ‘काबिल’चा ट्रेलर पाहता सोशल मीडिया आणि चित्रपट वर्तुळामध्येही सध्या या ट्रेलरचीच चर्चा आहे.

राकेश रोशन निर्मित आणि संजय गुप्ता दिग्दर्शित ‘काबिल’ हा चित्रपट २६ जानेवारी २०१७ ला प्रदर्शित होणार आहे. हृतिक आणि यामी गौतम व्यकिरिक्त या चित्रपटामध्ये अभिनेता रोनित आणि रोहित रॉय खलनायकी भूमिकेत झळकणार आहेत.

untitled-1

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 10:26 am

Web Title: kaabil trailer hrithik roshan is a man possessed watch video
Next Stories
1 Video: त्याने ‘किस’ करुन अनुष्काच्या गाण्याला दिली दाद
2 बुद्धावरील चित्रपटामुळे जनजीवनात बदल – गगन मलिक
3 करिनाने फवाद खानकडे केले दुर्लक्ष
Just Now!
X