News Flash

‘कहानी घर घर की’ मालिकेतील अभिनेत्याचं निधन

टीव्ही कलाकारांनी सचिनच्या निधनावर व्यक्त केला शोक

अभिनेता सचिन कुमार

‘कहानी घर घर की’ या मालिकेतील अभिनेता सचिन कुमार याचे शुक्रवारी (१५ मे) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राकेश पॉल, चेतन हंसराज, विनीत रैना, सुरभी तिवारी यांसारख्या टीव्ही कलाकारांनी सचिनच्या निधनावर शोक व्यक्त केला. सचिनने सुरुवातीला अभिनेता म्हणून इंडस्ट्रीत काम केलं. त्यानंतर तो फोटोग्राफीकडे वळला होता.

“सचिनचा झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी त्याच्या आईवडिलांनी त्याच्या बेडरुमचं दार ठोठावलं. मात्र काहीच उत्तर न आल्याने त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या किल्लीने दार उघडलं. तोपर्यंत सचिनने जगाचा निरोप घेतला होता”, अशी माहिती अभिनेता राकेश पॉलने ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना दिली. सचिन व राकेश एकमेकांचे खूप जवळचे मित्र होते.

‘स्पॉटबॉय इ’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता चेतन हंसराजने भावना व्यक्त केल्या. “ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. मलासुद्धा सोशल मीडियावरून सचिनच्या निधनाची बातमी समजली. कहानी घर घर की या मालिकेत आम्ही एकत्र काम केलं होतं. मात्र सचिनने नंतर अभिनयात काम करणं सोडून दिलं होतं.”

‘कहानी घर घर की’ या मालिकेशिवाय सचिनने ‘लज्जा’ या मालिकेतही काम केलं होतं. यामध्ये त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 12:12 pm

Web Title: kahaani ghar ghar kii actor sachin kumar passes away due to heart attack ssv 92
Next Stories
1 ..म्हणून अनन्याने सुहानाकडे उधारीवर मागितला टॉप
2 “राजकीय नेत्याशी माझं लग्न झालेलं नाही”; लग्नाच्या अफवांवर सोनालीचं स्पष्टीकरण
3 ‘रेड चिलीज’मधील कर्मचाऱ्याचं निधन; शाहरुखने व्यक्त केल्या भावना
Just Now!
X