News Flash

‘जसे आहोत तसे स्वीकारा’, मेकअपविना फोटो पोस्ट करत काजल अग्रवालचा संदेश

'आपण शारीरिक आकर्षणाने झपाटलेल्या जगात वावरतोय'

काजल अग्रवाल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री काजल अग्रवाल. तिने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. अभिनय कौशल्यासोबतच तिच्या सौंदर्यावर चाहते घायाळ आहेत. पण सध्या काजल एका वेगळ्यात फोटोसाठी चर्चेत आहे. तिने नुकताच सोशल मीडियावर मेकअपविना फोटो शेअर केला आहे. यासोबतच तिने लिहिलेली पोस्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

सेलिब्रिटींनी नेहमीच सुंदर दिसलं पाहिजे असा लोकांचा समज असतो. किंबहुना मेकअपशिवाय त्यांना फारसं स्वीकारलं जात नाही. याच विषयावर तिने तिच्या पोस्टमधून मार्मिकपणे भाष्य केलं आहे. ‘लोक आता स्वत:लाच ओळखू शकत नाहीत. कदाचित आपण शारीरिक आकर्षणाने झपाटलेल्या जगात वावरतोय म्हणून किंवा सोशल मीडियामुळे स्वत:ला जसे आहोत तसे स्वीकारू शकत नाही आहोत. सौंदर्य प्रसाधनांवर कोट्यवधी रुपये खर्च करत असतो. प्रत्येक ठिकाणी आपलं दिसणं अधिक महत्त्वाचं झालं आहे. यामागे धावणं किंवा स्वत:ला सगळ्यांपासून दूर ठेवणं यापेक्षा एक मध्यमार्ग उत्तम आहे. स्वत:बद्दलची खोटी प्रतिमा तयार करण्यापेक्षा आपण जसे आहोत तसे स्वीकारणे हा उत्तम पर्याय आहे. मेकअपने आपलं बाह्य सौंदर्य खुलून येतं पण आपण कोण आहोत हे आपले चारित्र्य सांगते. आपण जसे आहोत तसे स्वीकारणेच खरे सौंदर्य आहे,’ अशी पोस्ट तिने लिहिली आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीनेही काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सौंदर्याची नवी परिभाषा मांडली होती. ‘आत्मविश्वास हेच खरे सौंदर्य’ असं सांगत तिने दिसण्यावरून न्यूनगंड असलेल्यांसाठी मोलाचा संदेश दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 6:32 pm

Web Title: kajal aggarwal sends a strong message by sharing some make up free pics
Next Stories
1 घराणेशाहीवर बोलण्यापेक्षा कामातून व्यक्त व्हा – अनन्या पांडे
2 तुमच्या आवडत्या मालिकांसोबत रंगणार मनोरंजनचा रविवार
3 सिनेमात काम करण्यासाठी त्यांनी सोडली बँकेची नोकरी
Just Now!
X