News Flash

अजय मला वेळोवेळी सुंदरतेची जाणीव करुन देतो- काजोल

सुंदरताही पाहणाऱ्याच्या नजरेत असावी लागते.

अजय देवगण आणि काजोल

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री काजोल आजही तिच्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ घालते. बॉलिवूडमध्ये पदार्पणानंतरची तिच्या सुंदरतेची जादू नव्वदीच्या दशकात होती तशीच आजही कायम आहे. ज्यावेळी मी तयार होत असते तेव्हा आजही अजय माझ्या सौंदर्याचे कौतुक करतो. अजय मला वेळोवेळी सुंदरतेची जाणीव करुन देतो, असे काजोलने म्हटले आहे. मला माझी सुंदरता कळण्यासाठी भरपूर वेळ लागला असेही ती म्हणाली.

पूर्वी मी ज्याप्रमाणे स्वत:कडे पाहायचे ती नजर मी आता बदलली असून मी स्वत:ला सुंदर असल्याचे मानते असे काजोल म्हणाली. वयाच्या ४२व्या वर्षीही आपल्या सौदर्याने आकर्षित करणाऱ्या काजोलने सुंदरता टिकविण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला. सुंदरतेचा महत्वाचा सल्ला मी माझ्या मुलीलाही देते असे काजोल एका कार्यक्रमामध्ये म्हणाली.

मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये काजोलने आपली आई तनुजा यांच्या सुंदरतेचे तोंडभरुन कौतुक केले. मी जेव्हा माझ्या आईच्या वयाची होईन तेव्हाही मला तिच्यासारखच सुंदर राहायचं आहे अशी काजोलने इच्छा व्यक्त केली. सुंदरतेविषयी बोलताना काजोल आणखी एका गोष्टीवर अधिक भर देताना दिसली. अजय नेहमी माझ्या सुंदरतेची प्रशंसा करतो असे सांगणाऱ्या काजोलने सुंदरताही पाहणाऱ्याच्या नजरेत असते असे सांगत तिचे सौदर्य जणू अजयमुळे खुलत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.
काजोल आणि अजय देवगणने १९९९ मध्ये लग्न केले होते. बॉलिवूडच्या या स्टार जोडीला न्यासा आणि युग ही दोन मुलं आहेत. २००३ मध्ये न्यासाच्या जन्मानंतर काजोलने ‘फना’, ‘यू मी और हम’, ‘माय नेम इज खान’, ‘वी आर फॅमिली’, ‘टूनपुर का सुपरहिरो’ यांसारख्या चित्रपटात काम केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 11:51 am

Web Title: kajol said that it took her a long time to accept that she is beautiful
Next Stories
1 झोपडपट्टीतल्या जगण्याचा ‘आसरा’
2 मुव्ही रिव्ह्यू- फोर्स २ : अ‍ॅक्शन अ‍ॅक्शन अ‍ॅक्शन
3 आर्थिक परीक्षेच्या काळातही ‘व्हेंटिलेटर’ची कोट्यवधींची कमाई
Just Now!
X